मुलुंड मध्ये एका मराठी महिलेला कामासाठी जागा नाकरल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मनसेने (MNS) त्या सोसायटी मध्ये सचिवाला माफी मागायला लावली. पीडीत महिलेचा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील आपल्याला असा अनुभव आल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
पंकजा मुंडे यांनी सोशल मीडीयात एक व्हिडिओ शेअर करत सद्य राजकीय, सामाजिक स्थितीवर आपल्या भावना व्यक्त करताना मुंबई मध्ये मलाही शासकीय घरं खाली करत नवं घर शोधताना हा अनुभव आल्याचं म्हणाल्या आहेत. Raj Thackeray's Warning: 'अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे'; मुलुंड मधील घटनेनंतर राज ठाकरेंनी पुन्हा ठणकावलं .
पंकजा मुंडे व्हिडीओ
View this post on Instagram
"आज एका मराठी मुलीची व्यथा मी पाहिली. खरं तर भाषा आणि प्रांतवादामध्ये पडायला मला आवडत नाही. माझ्या संपूर्ण राजकीय प्रवासात मी कधीही जातीवाद, प्रांतवाद, धर्मवाद यावर टीप्पणी केलेली नाही. कोणी कोणत्या भाषेत बोलावं. कोणी कोणत्या भाषेत त्यांच्या घरांची, दुकानांची नावं ठेवावीत यावर मी फार कधी उडी घेतलेली नाही. पण एक मराठी मुलगी जेव्हा रडून सांगत होती की इथे मराठी माणसाला घर देत नाहीत. इथे मराठी माणसाला प्रवेश दिला जात नाही. हे म्हणत असताना तिच्याबरोबर जो प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणार आहे" असं त्या म्हणाल्या आहेत.
मुंबईच सौंदर्य हे प्रत्येक भाषेने, प्रत्येक जातीने आणि प्रत्येक धर्माने नटलेलं आहे. ही राजकीय नसून आपल्या देशाची आर्थिक राजधानी असल्याने इथं सर्वांचं स्वागतच आहे. पण आम्ही यांना घर देत नाही असं काही इमारतींमध्ये बोलत असतील तर हे फार दुर्देवी आहे. असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.