Samadhan Autade, Bhagirath Bhalke | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक 2021 (Pandharpur By Election Results 2021) मध्ये भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Autade) हे विजयासमीप पोहोचले आहे. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये आवताडे यांनी मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (BJP) उमेदवार भगीरत भालके (Bhagirath Bhalke) हे पराभवाच्या छायेत आहेत. मतमोजणीच्या 30 फेऱ्या आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार समाधान आवताडे यांनी 89,037 मते मिळवत 6,910 आघाडी घेतली आहे. तर भगीरत भालके हे 82,127 मते मिळवत आवताडे यांना मागे टाकण्यासाठी प्रयत्नरत आहेत.भगीरत भालके विरुद्ध समाधान आवताडे ही काट्याची टक्कर मागे पडत आता मोठ्या फरकाने आघाडी सुरु झाली आहे.

भगीरत भालके विरुद्ध समाधान आवताडे हा सामना सकाळी मतमोजणी सुरु झाल्यापासून सुरु होता. जवळपास मतमोजणीच्या 25 ते 28 व्या फेरीपर्यंत हा सामना अवघ्या काहीशे मतांच्या फरकाने मागे पुढे होत होता. त्यातही समाधान आवताडे हेच आघाडीवर होते. परंतू ही आघाडी कधी 500 तर कधी 800 मते इतक्याच प्रमाणात होती. 27 व्या फेरीदरम्यान मात्र चित्र मोठ्या फरकाने बदलू लागले. समाधान आवताडे हे भरीगत भालके यांच्यापेक्षा अधिक मते मीळवताना पाहायला मिळू लागले. (हेही वाचा, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक- 30 वी फेरी- समाधान आवताडे 6,910 मतांनी आघाडीवर)

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक असली तरी या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजप (BJP) अशा दोन्ही प्रमुख पक्षांनी प्रचाराची आघाडी घेतली. कोरोना व्हायरस महामारीचे संकट असतानाही दोन्ही पक्षांनी प्रचंड गर्दी करत प्रचारसभा घेतल्या. पडद्यावरचे आणि पडद्यामागचे राजकारण केले. अजित पवार , जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे तर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे भाजचे महाराष्ट्रातील पहिल्या फळीतील नेते मैदानात उतरले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप उमेदवारांच्या प्रचाराची उत्सुकता शिगेला पोहोचली. दोन्ही पक्षांनी कारणाशिवाय ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यामुळे सहाजिकच निकालाबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, जनमताचा कानोसा म्हणाल तर या निवडणुकीत राष्ट्रवादी काटावर पास तर भाजप थोडक्यात बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात ही शक्यता खरी की खोटी हे कळायला 2 मे हा दिवसच उजाडावा लागेल हे नक्की.