Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
5 minutes ago

Pandharpur By Election Results 2021 Live News Updates: पंढरपूर विधानसभा निवडणूक-36 वी फेरी- भाजपचे समाधान आवताडे 4,102 मतांनी आघाडीवर

महाराष्ट्र अण्णासाहेब चवरे | May 02, 2021 06:21 PM IST
A+
A-
02 May, 18:21 (IST)

पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे विजयी झाले आहेत. आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भगीरत आवताडे यांच्यावर 3 हजार पेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला. भगिरत भालके यांना 1,07,717 मते तर आवताडे यांना 1,09,450 मिळाली

02 May, 16:29 (IST)

पंढरपूर विधानसभा निवडणुकीत 36 व्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे 4,102 मतांनी आघाडीवर आहेत. समाधान आवताडे यांना 1,04,285 मते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांना 1,00,183 मते मिळाली आहेत. शेवटच्या दोन फेऱ्यांसाठी मतमोजणी सुरु आहे.

02 May, 15:07 (IST)

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत 97,212 मतांनी भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर आहेत. 35 व्या फेरीअखेर 1,01,606 मते मिळवत भगीरत भालके काहीसे मागे राहिले आहेत. अद्याप 3 फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे काय होते याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

02 May, 15:00 (IST)

बेळगावमध्ये सतीश जारकीहोळी यांनी पुन्हा मुसंडी मारत  9848 मतांची आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तर भाजपच्या 2,51,887 मते घेत आघाडीवर आहेत. महाराष्ट्र एकिकरण समितीचे शुभम शेळके 85,553 मते घेत  तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

02 May, 15:00 (IST)

बेळगावमध्ये सतीश जारकीहोळी यांनी पुन्हा मुसंडी मारत  9848 मतांची आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तर भाजपच्या 2,51,887 मते घेत आघाडीवर आहेत. महाराष्ट्र एकिकरण समितीचे शुभम शेळके 85,553 मते घेत  तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

02 May, 15:00 (IST)

बेळगावमध्ये सतीश जारकीहोळी यांनी पुन्हा मुसंडी मारत  9848 मतांची आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तर भाजपच्या 2,51,887 मते घेत आघाडीवर आहेत. महाराष्ट्र एकिकरण समितीचे शुभम शेळके 85,553 मते घेत  तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

02 May, 14:15 (IST)

पंढरपूरमध्ये काट्यांची टक्कर मागे पडत आता मोठ्या फरकाने आघाडी सुरु झाली आहे. समाधान आवताडे यांनी 89037 मते मिळवत 6,910 आघाडी घेतली आहे. तर  भगीरत भालके हे 82,127 मते मिळवत आवताडे यांना मागे टाकण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

02 May, 13:45 (IST)

पंढरपूर मतदारसंघात भाजप उमेदवार समाधान आवताडे 6,632 मतांनी आघाडीवर आहेत. परंतू असे असले तरी अवताडे यांचे मताधिक्य घटताना दिसत आहे आवताडे मते 80557 घेत आघाडीवर आहे. तर भगीरथ भालके यांना 73,995 मते मिळाली आहेत.

02 May, 13:23 (IST)

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 25 व्या फेरीत भाजपाचे समाधान आवताडे 6334 मतांनी आघाडी घेतली आहे.

02 May, 13:10 (IST)

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या 22 व्या फेरीत भाजपाचे समाधान आवताडे 3946 मतांनी आघाडीवर आहेत.

Load More

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक (Pandharpur Mangalwedha Assembly Bypoll Results) आणि बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक (Belgaum Lok Sabha By-Election 2021) मतमोजणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आज (2 मे 2021) या पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडत आहे. सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणी सुरु झाली आहे. ही मतमोजणी एकूण 24 फेऱ्यांमध्ये पार पडणार होती. परंतू, कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर 38 फेऱ्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण निकाल हाती येण्यास बराच वेळ लागणार आहे. असे असले तरी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत निवडणूक निकालाचा कल स्पष्ट समोर येणार आहे. पंढरपूर मतदारसंघात प्रामुख्याने मुख्य लढत ही भाजपचे समाधान अवताडे आणि राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्यात होत आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणूक लागली होती.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतमोजणीस सुरुवात झाली आहे. बेळगाव येथील आरपीडी महाविद्यालायात मतमोजणी सुरु आहे. काँग्रेसचे सतीश जारकीहोळी, भाजपच्या मंगला अंगडी आणि समितीचे शुभम शेळके यांच्यात या निवडणुकीत मुख्य लढत होत आहे. सांगितले जात आहे की, कोरोना महामारी निर्बंधांनुसार कोणताीह उमेदवार किंवा त्यांचा एजंट यांना कोरोना व्हायरस चाचणी कारावी लागणार आहे. कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याशिवाय कोणताही उमेदवार अथवा त्यांच्या एजंटला मतदान केंद्रांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना नियमांचे काटेकोर पालण करण्यासाठी कोणताही अनुचीत प्रकार टाळणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगाल , केरळ, तामिळनाडू, असम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांसाठी पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2021 च्या मतदानाची मतमोजणी आज (2 मे 2021) पार पडत आहे. या पाच राज्यांपैकीअसम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी राज्यांत एकाच टप्प्यात निवडणुका पार पडल्या आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यात मतदान पार पडले. करोना व्हायरस संकट कायम असताना या निवडणुका पार पड्ल्या आहेत. निवडणउका पार पडत असलेल्या राज्यांतील सर्व मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या निवडणूक प्रचारात विशेष हजेरी लावली होती. त्यामुळे या निवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. निवडणुकांचे निकाल काय येतील याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.


Show Full Article Share Now