Photo Credit- X

Palghar Shocker: पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलेचा प्रसूतीदरम्यान हृदयविकाराच्या झटका (Heart Attack)आल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत (Pregnant Woman Dies)आहे. जव्हारच्या पतंगशाह कॉटेज रुग्णालयात ही घटना घडली. पसूतीदरम्यान बाळालाही वाचवण्यात डॉक्टर असमर्थ ठरले. कुंता वैभव पडवळे असे मृत महिलेचे नाव आहे, त्या विक्रमगड तालुक्यातील गलतारे गावात राहत होत्या. (Mumbai Shocker: मोठ्या बहिनीला जास्त प्रेम करते म्हणत लहान मुलीने केली आईची हत्या, पोलिसांनी केली अटक)

अर्भकाला वाचवण्यात अपयश

मंगळवारी रात्री त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथून त्यांना जव्हार येथील शासकीय पतंगशाह कॉटेज रुग्णालयात पाठवण्यात आले. प्रसूतीदरम्यान हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर गर्भात असलेल्या बाळाला डॉक्टरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही. बाळाचाही मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.