पालघर (Palghar) मधील एका गर्भवती महिलेला लेबर पेन (Labour Pain) सुरु झाल्याने रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी रुग्णवाहिकेशी संपर्क करण्यात आला होता. मात्र रुग्णवाहिका वेळेवर न पोहचल्याने 25 वर्षीय गर्भवती महिलेवर मृत्यू ओढावल्याचे रविवारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही घटना काही दिवसांपूर्वीची असून गर्भवती महिला High Risk कॅटेगरी मधील होती. तसेच तिचे वजन कमी आणि कमी रक्तदाब अशी समस्या सुद्धा उद्भवल्याचे त्यांनी म्हटले आहे.जिल्ह्यातील वैद्यकिय अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी यांनी असे म्हटले की, रुग्णवाहिका निश्चित स्थळी पोहचण्यास उशिर झाला. कारण एक रुग्णवाहिका COVID19 येथे कार्यरत होती. तर दुसरी तुटली होती.(सोलापूर: कारखान्यात विषारी वायूची गळती झाल्याने 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू)
दरम्यान, 17 नोव्हेंबरला मनिषा धोरे ही सात महिन्यांची बाळंतीण होती. तर तिला घरीच लेबर पेन सुरु झाले. यामुळे घरातील मंडळींनी तातडीने रुग्णवाहिकेला संपर्क साधला. परंतु रुग्णवाहिकेला येण्यास उशिर होत असल्याचे पाहून तिला स्थानिकांनी कपड्यांचे स्ट्रेचर बनवून मुख रस्त्यालगत घेऊन आले. तेव्हा दोन तास उलटल्यानंतर रुग्णवाहिला तेथे पोहचली. त्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. याच कारणास्तव तिला नाशिक जिल्ह्यातील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी सदर महिलेवर 18 नोव्हेंबरला सीजर सर्जरी सुद्धा केली. मात्र तिला वाचवण्यात यश आले नाही.
रुग्णवाहिकेमुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यास उशिर झाला. कारण खोडाला पीएचसी ही कोविड19 च्या सेवेत कार्यरत होती. तर दुसरी आपत्कालिन परिस्थितीसाठी उपलब्ध असलेली मोखाडा ही तुटली होती. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महिलेबद्दल ही अधिक माहिती मिळवण्यास सांगण्यात आले आहे.(Nalasopara Suicide: खळबळजनक! लग्नाला 2 वर्षही झाले नाहीत अन् एका दाम्पत्याची गळफास लावून आत्महत्या; नालासोपारा येथील घटना)
महिलेने यापूर्वी एकदा गर्भपात केला असून दुसऱ्या वेळेत ती गर्भवती झाली होती. परंतु डॉक्टरांनी तिला पुन्हा एकदा गर्भवती होण्याची रिस्क घेऊ नको असे ही म्हटले होते. डॉ. सुर्यवंशी यांनी असे म्हटले की, गेल्या सात महिन्यामध्ये त्यांनी तिचे पाच वेळा चेकअप केले होते. त्याचवेळी ती हाय रिस्क कॅटेगरी मध्ये असल्याचे दिसून आले होते.