
मुंबईच्या पालघर (Palghar) येथील डहाणू भागात 48 वर्षीय व्यक्तीने त्याच्या 12 वर्षीय पुतणीवर अनेकदा बलात्कार करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरी बोलावून तिला आईस्क्रिम आणि इतर चविष्ट पदार्थांचं आमिष दाखवत जवळीक साधत होता. या चिमुकलीच्या आईचं काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. मात्र चिमुरडीने पोलिसामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लज्जास्पद! 1000 बहिणींचा भाऊ अशी ओळख असणाऱ्या नगरसेवकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोलिसांकडे दिली कबुली
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली. यामध्ये त्यांनी चिमुकलीवर अनेकदा बलात्कार केल्याच्या आरोपाची कबुली दिली आहे. या पीडितीचे वडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर तो चिमुकलीला घरी बोलवायचा आणि त्यानंतर बलात्काराचा प्रयत्न करायचा असं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. असे MID DAY शी बोलताना पोलिस अधिकारी हेमंत काटेकर यांनी सांगितलं आहे.
आरोपीला पोलिसांनी इंडियन पिनल कोड च्या बलात्कार आणि लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराच्या संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दहिसर पोलिसांनी कारवाई करत 40 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. बोरिवली येथे 4 वर्षीय चिमुरडीलादेखील अशाच प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याची कबुली केली आहे. तिच्या गुप्त भागांवर चटक्यांचे डाग आढळून आले आहेत.
बलात्कार प्रकरणी सध्या मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत.