Farm Laws: बाळासाहेबांची शिवसेना आता शरद पवार यांच्यापुढे लीन झाली आहे- प्रविण दरेकर
Pravin Darekar, Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naredra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. या कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’(Bharat Bandh) आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह (Shiv Sena) महाविकास आघाडीने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. याच पार्श्वभूमी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिवसेनावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. केंद्राने आणलेला कायदा शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहे. बंदमध्ये सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना शेतकऱ्यांचा पुळका नाही, ते केवळ स्वार्थासाठी हे करत आहेत. सध्याच्या शिवसेनेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीचा विसर पडला आहे. संपूर्ण पक्ष हा आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापुढे लीन झाला आहे, असे प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

भाजपसोबत युती तोडून शिवसेनेने महाविकास आघाडीसोबत गेली. मात्र, त्यानंतर शिवसेनेचे हिंदुत्वाविषयीचे आचारविचार कळले. राज्य सरकारने स्वत:च्या काळजात काय चालले आहे? यापेक्षा शेतकरी आणि जनतेच्या मनातील गोष्टी जाणून घ्याव्यात. काही दिवसांपूर्वी कृषी कायदे आणण्यासाठी याच राजकीय पक्षांनी खुलेआम पत्रक काढले होते, समर्थन दिले होते. त्यामुळे आजचा बंद हा शेतकऱ्यांचा आडून राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय मंत्री असताना स्वत: शरद पवार यांनी राज्यातील सर्व मुख्यमंत्र्याना पत्र पाठवून या कादद्याचे महत्व पटवून देण्याच काम केले होते. मग आता नरेंद्र मोदी यांनी हा कायदा आणला तर, त्याला विरोध का? अशी टीका प्रविण दरेकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राज्य सरकारवर केली आहे. हे देखील वाचा- Governor Bhagat Singh Koshiyari: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याविरुद्धच्या अवमान याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिले होते. सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पुन्हा एकदा व्हायरल झाले आहे. यासंदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ज्या लोकांनी या पत्राचा हवाला दिला आहे, त्यांनी हे पत्र व्यवस्थित वाचले असते तर त्यांचा वेळ वाचला असता. या पत्रात कायद्यातील सुधारणांसंदर्भात लिहण्यात आले होते. परंतु, केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यात याचा उल्लेख नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.