ताडोबा जंगल सफारी (Photo Credit : Facebook)

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वन्यजिवांची आवड असणाऱ्यांना इंटर्नशीप करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवार 25 प्रेब्रुवारी पर्यंत इंटर्नशीपसाठी अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवाराला ताडोबाच्या संकेतस्थळावर जाव लागेल. ताडोबात इंटर्नशीप करण्याची संधी मिळाल्याने वन्यजिवप्रेमींच्या अनुभवात भर पडणार आहे. तसेच त्यांना ताडोबाच्या नैसर्गिक सफरीचा आणि वातावरणाचा आनंद घेता येणार आहे.

दरम्यान, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने वन्यजीव संरक्षण व वनसंपदा संवर्धनासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यात इंटर्नशीपचादेखील समावेश आहे. ताडोबात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता व्यवस्थापनाने मार्च ते जून 2021 या कालावधीत वन्यजीवप्रेमींसाठी इंटर्नशिप करण्याची संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (वाचा -

इंटर्नशिपसाठी पात्रता -

कोणत्याही विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची तयारी आदी अर्हता असणारे उमेदवार इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात.

ताडोबामध्ये या पाच शाखांमध्ये इंटर्नशिपची संधी -

ताडोबामध्ये उमेदवार पर्यटन, बांधकाम, वास्तुरचना, सोशल मीडिया, माहिती-तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धन अशा पाच शाखांमध्ये इंटर्नशिप करू शकतात. विशेष म्हणजे ही इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला खास इंटर्नशिप प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.