MNS Leader Raj Thackeray (Photo Credits-Twitter)

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेससह (NCP) अनेक पक्ष तयारीला लागले आहेत. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (Maharashtra Navnirman Sena) पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर असून त्यांनी पुण्यातील मनसे शाखाध्यक्षांचा मेळावा घेतला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसेकडून कोणाला तिकीट दिले जाणार? याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.

राज ठाकरे यांनी आज पुण्यातील मनसे शाखाध्यक्षांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांना त्यांच्या शैलीत मार्गदर्शन केले. "शाखाध्यक्ष झालात म्हणून तिकीट मिळणार, असे नाही. जो चांगले काम करेल, त्यालाच पक्षाकडून तिकीट दिले जाणार," असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच पदाधिकाऱ्यांना चांगली प्रतिमा ठेवण्याचे आणि लोकांमध्ये जाण्याचे राज ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत. याशिवाय शाखाध्यक्षांचा प्रत्येक महिन्यांचा कामाचा अहवाल देखील राज ठाकरे यांनी मागवला आहे. हे देखील वाचा- मागील वर्षीप्रमाणे यंदा सणासुदीनंतर कोरोना रूग्ण वाढ रोखण्यासाठी 'गर्दी' टाळा, लसीकरणानंतरही मास्क वापरा: CM Uddhav Thackeray यांचं 'माझा डॉक्टर वैद्यकीय परिषद' दरम्यान आवाहन

पुणे महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत मनसेला अपयश आले होते. त्यावेळी मनसेचे केवळ दोनच उमेदवारांना विजय मिळवता आले होते. मात्र, पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मनसे जागेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष पुणे महानगरपालिकेची निवडणूक एकत्रित लढवणार असल्याने सत्ताधारी भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.