मुंबई (Mumbai) येथील धारावी (Dharavi) परिसरात कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे मोठ्या वेगाने पसरत चालले आहे. मात्र, धारावीकरांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. धारावीत आज केवळ एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 335 वर पोहोचली आहे. यापैकी 84 जणांचा मृत्यू झाला आहे. ‘मिशन धारावी’च्या यशामुळे करोनाचे उच्चाटन होण्याच्या दिशेने धारावीची वाटचाल सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असे बिरुद मिरवणाऱ्या धारावीमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर सरकारी यंत्रणेचे धाबे दणाणले होते. मात्र, गेल्या काही दिवासांपासून या भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे
कोरोना प्रादर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. येथील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. मात्र, तरीही धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येथील मुस्लिम नगर आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे देखील वाचा- Mumbai: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 3,520 बेड्सच्या कोरोना उपचार सुविधांचे लोकार्पण; मुलुंड, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स व बीकेसी याठिकाणी उभारली आरोग्य केंद्रे
पीटीआयचे ट्वीट-
Only one new coronavirus patient reported in Mumbai's Dharavi, case tally in area rises to 2,335: civic body
— Press Trust of India (@PTI_News) July 7, 2020
गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णवाढीचा दर मंदावल्याचे संकेत मिळाल्यामुळे धारावीकरांसाठी सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रांपैकी दोन केंद्रे अखेर बंद करण्यात आली. एकेकाळी मुंबईतील कोरोनाचे अतिसंक्रमित क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे विभाग आता आटोक्यात आल्याचे चित्र आहे. वरळी, वांद्रे, भायखळा, नागपाडा, कुर्ला, माटुंगा, वडाळा, देवनार, मानखुर्द हे भाग आता रुग्णवाढीत सगळ्यात खालच्या क्रमांकावर आले आहेत.