सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या बाबतीत महाराष्ट्र (Maharashtra) राज्य देशात अव्वल आहे. राज्याची राजधानी मुंबई (Mumbai) देखील सर्वात बाधित शहरांपैकी एका आहे. मात्र समाधानाची बाब म्हणजे राज्यातील व मुंबईमधील रिकव्हरी रेट वाढत आहे. सरकार रुग्णांच्या सुविधांवर लक्ष केंद्रित करत असल्याने रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण बरे होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज 3520 रुग्णशय्यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकार्पण करण्यात आले. मुलुंड, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स व बीकेसी (BKC) या ठिकाणी मिळून उभारण्यात आलेल्या विविध कोरोना आरोग्य केंद्रातील हे बेड्स आहेत.
लवकरच हे बेड्स कोरोना बाधितांवर उपचारासाठी उपलब्ध होणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्स येथे समर्पित कोरोना आरोग्य केंद्र उभारण्यात आले असून, तेथे 700 बेड्स उपलब्ध आहेत. बीकेसी येथे एमएमआरडीए (MMRDA) यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील समर्पित कोरोना आरोग्य केंद्रात 112 बेड्स हे अतिदक्षता उपचार करण्यासाठी असतील. दहिसर पूर्व येथील 900 बेडचे कोविड केअर सेंटर मुंबई मेट्रोच्या सहाय्याने विकसित करण्यात आले आहे. दहिसर पश्चिममधील कंदरपाडा येथे कोरोना समर्पित हॉस्पिटल असून, 100 बेड्स हे आयसीयू सुविधांनी सुसज्ज आहेत. (हेही वाचा: Coronavirus: वाक्यातील चूक दुरुस्त केली जाऊ शकते, कृतीतील नाही- महाराष्ट्र पोलीस)
Earlier today, Chief Minister Uddhav Thackeray ji presided over the commissioning ceremony of 4 field hospitals. These field hospitals adding a total of 3205 beds and 222 ICU/ acute care beds were added from Mulund, Dahisar, BKC and Mahalaxmi racecourse. (1/n) pic.twitter.com/hwmDyi3a8o
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 7, 2020
मुलुंडमध्ये कोविड रूग्णांच्या उपचारासाठी 1,700 बेड असतील. हे सिडकोने बनविले आहे आणि सुमारे 500 बेड्स ठाणे महानगपालिकेसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख, पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. तर अशाप्रकारे बृहन्मुंबई महानगरपालिका, सिडको, मुंबई मेट्रो आणि नमन ग्रुप यांच्या सहकार्याने कोरोना बाधीत रूग्णांच्या उपचारासाठी या सुविधा उभारण्यात आल्या आहेत.