COVID19: कल्याण व डोंबिवली येथील समर्पित कोविड19 काळजी केंद्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
Online Inauguration of COVID19 Care Centers (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज डोंबिवली येथील पाटीदार भवन (Patidar Bhavan, Dombivali) व कल्याण (Asra Foundation, Kalyan) येथील आसरा फाऊंडेशन येथे कोविड रुग्णांसाठी समर्पित आरोग्य केंद्र, त्याचप्रमाणे गौरीपाडा, कल्याण येथील महापालिकेच्या स्वॅब टेस्टिंग सेंटर यांचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला आहे. केवळ मोठमोठ्या सुविधा उभारून चालणार नाही तर योग्य पद्धतीने रुग्ण सेवा, वैद्यकीय उपचार आणि पुरेशी ऑक्सिजन व्यवस्था तात्काळ उपलब्ध करा. कोरोनाच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी एकत्रित दर्जेदार सुविधांच्या निर्मितीबरोबरच मोठ्या प्रमाणावर ट्रेसिंग करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

कल्याण (प) येथील आसरा फाऊंडेशनच्या जागेत कोविड आरोग्य केंद्र उभे राहत असून त्यामध्ये 100 ऑक्सिजन बेड, 84 नॉर्मल बेड, 10 सेमी-आयसीयू बेडची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध असणार आहे. कल्याण (प) येथे महापालिकेचे स्वॅब चाचणी केंद्र पी.पी.पी तत्वावर तयार होत असून तेथे दररोज 3 हजार कोरोना चाचण्या होवू शकतात. डोंबिवली पूर्व येथील पाटीदार भवन येथे प्रशस्त जागेत कोविड समर्पित आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. याठिकाणी एकूण 210 बेड रुग्णांसाठी उपलब्ध असून 200 बेड ऑक्सिजनची सुविधा असलेले आणि 10 सेमी आयसीयू बेड आहेत. या इमारतीत डॉक्टर्स, त्यांचे रहिवास, रेस्टरुम व त्यांचे कार्यालय असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या संकेत स्थळवरून देण्यात आली आहे. हे देखील वाचा- CM Uddhav Thackeray Interview: पोटदुखी हे सुद्धा कोरोना व्हायरस संसर्गाचे लक्षण असू शकेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला

ट्विट-

कोविडवर उपचार मिळण्याकरता सोयीसुविधा,अद्ययावत वैद्यकीय सामुग्रीसह उभे केलेले कोविड केअर सेंटर सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. या संकटात रिलायन्स, टाटा,बिर्ला सारख्या कंपन्यांनी केलेली मदत कौतुकास्पद आहे.या संकटावर संघटितपणे आपण मात करू. शासन या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.