Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Chhatrapati Sambhaji Nagar News: ऑनलाईन गेम खेळताना पैसे गमावल्याच्या ताणातून एका युवकाने आत्महत्या (Suicide) केली आहे. गौरव चंद्रकांत पवार (वय 23 वर्षे, रा. पवननगर, टीव्ही सेंटर) असे या तरुणाचे नाव आहे. तो अभियांत्रीकीचे शिक्षण घेत होता. हर्सूल (Harsul Lake) तलावात उडी घेऊन या युवकाने आपले जीवन संपवले आहे. पोलिसांनी आकस्मीक मृत्यू अशी या घटनेची नोंद केली आहे. गौरंव यास ऑनलाईन गेम खेळण्याचे प्रचंड व्यसन होते. त्यातून त्याला मोठाच आर्थिक फटका बसला. ज्यामुळे त्याचे मोठेच नुकसान झाले.

पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, गौरव पवार हा ऑनलाईन गेम खेळत असे. त्याचे ऑनलाईन गेम खेळण्याचे व्यसन इतके वाढले होते की, तो त्याच्या आहारी गेला होता. त्यातूनच त्याने सुमारे 50 हजार रुपये खर्च केले होते. त्याच्या या व्यसनाची कुटुंबीय आणि नातेवाईकांनाही चिंता होती. ऑनलाईन गेम खेळताना झालेल्या नुकसानीची भरपाऊ म्हणून आणि त्याला या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या मानाने त्याला 40 हजार रुपयांची मदतसुद्धा केली होती. दरम्यान, त्याे आत्महत्या केल्याची बातमी आली आणि नातेवाकांना धक्का बसला.

नेहमीच ताण-तणावात असणाऱ्या आणि चिडचिडा झालेल्या गौरव याने ही घटना घडली त्या दिवशी सकाळी वडिलांसोबत जेवण केले. त्यानंतर त्याचे आईवडील कामानिमितित बीडला गेले. तीच संधी साधून गौरव घरातून बाहेर पडला आणि तलाव गाठला. बराच काळ तो तलावाच्या किनारी बसून होता. काही वेळीने त्याने तलावात उडी घेतली आणि स्वत:ला संपवले.

गौरव याने हर्सूल तलावात उडी घेतल्याचे तलावाचा सुरक्षा रक्षक राजेश गवळे याच्या लक्षात आले. त्याने या प्रकाराची माहिती पोलिसांना लगेचच दिली. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गौरव याला बाहेर काले. मात्र, तोवर त्याचे प्राण गेले होते. निपचीत पडलेल्या गौरवला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.