Online Fraud in Maharashtra: निवृत्त आरबीआयच्या कर्मचाऱ्याची तब्बल 3.38 लाखांची फसवणूक, ठाणे येथील घटना
fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

Online Fraud in Maharashtra: आरबीआय मधील एका निवृत्त कर्मचाऱ्याची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये व्यक्तीला 3.38 लाखांचा गंडा घातला गेला आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने 70 वर्षीय वृद्धा महिलेला फोन करत तो एसबीआयचा अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. या प्रकरणी 11 नोव्हेंबरला चितळसर मनपाडा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

इंडियन एक्सप्रेस यांच्या रिपोर्ट्सनुसार, तक्रारदार महिलेला तिच्या मोबाईलवर 8 नोव्हेंबरला केवायसी संदर्भात एक मेसेज आला होता. हा मेसेज एसबीआयच्या नावे आणि क्रमांकाने आल्याने महिलेने त्यावर फोन केला. तेव्हा फोनवरील व्यक्तीने तो एसबीआय मधून राहुल बोलत असल्याचे सांगितले. त्याचसोबत त्याने महिलेला आम्ही वृद्ध लोकांसाठी केवायसी अपडेट करण्यासंदर्भात नवी ऑनलाईन सेवा सुरु केल्याचे सांगितले.(Aurangabad Shocker: औरंगाबादमध्ये 32 वर्षीय व्यक्तीने केला पोटच्या मुलीचा खून; आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न)

आरोपीने महिलेला एक लिंक पाठवत त्यामध्ये तिच्या बँक खात्याची माहिती देण्यास सांगितले. जेणेकरुन तिचे केवायसी अपडेट होईल. लिंकवर क्लिक केल्यानंतर एक वेबपेज सुरु होत त्यावर एसबीआयचा लोगो दिसून येत होता. महिलेने जसे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर सर्व माहिती दिली असता तिच्या खात्यातून 3.38 लाख रुपये डेबिट झाले. या प्रकारामुळे महिलेने शेजाऱ्यांच्या मदतीने कार्ड ब्लॉक केले.

महिलेने या प्रकरणी पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात एफआयआर दाखल केला. तसेच तिने पोलिसांना सांगितले की, ती आरबीआयची निवृत्त कर्मचारी असून पेन्शन हे एकच तिच्याकडे उत्पन्नाचे साधन आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.