Human Trafficking And Bead Crime: पतीपासून वेगळी राहात असलेल्या महिलेला दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवून तिच्या एक वर्षाच्या बाळाची विक्री केल्याचे एक धक्कादायक प्रकरण पोलिसांनी उघडीस आणले आहे. घटना बीड जिल्ह्यातील बाजलगाव येथे घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, एक वर्षाच्या बाळाची तब्बल 350000 रुपयांना विक्री करण्यात आली होती. मात्र, पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कारवाई करत हे प्रकरण हाणून पाडले. पोलिस कार्वाईत चार आरोपींना अटक झाली आहे. तसेच, विक्री झालेले बाळही सुखरुप परत मिळवून त्याच्या आईकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील एका 20 वर्षीय तरुणीचा विवाह झाला होता. मात्र, तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, तिने एका बाळालाही जन्म दिला. त्या संबंधाची माहिती तिच्या पतीला कळली. पतीने तिला आपल्यापासून घालवून दिले. त्यानंतर सदर महिला आपल्या बाळासोबत माहेरी आईसोबत माजलगाव येथे राहात होती. दरम्यान, याच ठिकाणी छाया नावाची महिला राहात होती. तिचेही तिच्या पतीशी जमत नव्हते. छायाचे या महिलेकेडे येणेजाणे होते. त्यातून दोघांध्ये परिचय होता. या कहाणीने वळण तेव्हा घेतले जेव्हा वासुदेव भोजने (वय 32 वर्षे, रा. बुलढाणा) याची एण्ट्री झाली.
वासुदेव भोजने याचे छायाकडे येणेजाणे होते. त्यातूनच त्याची ओळख बाळाची आई असलेल्या महिलेशी झाली. छायाने महिलेला तिचे दुसरे लग्न लावून देण्याचे अश्वासन दिले. मात्र, बाळाचे काय हा प्रश्न निर्माण होताच. तो भोजने याने सोडवला. त्याने या बाळाला स्वत:चे नाव दिले. तसेच छायाने मध्यस्थी करत कोल्हापूर येथील एका ललिता नामक महिलेशी संपर्क साधला. ललिता ही मुलं विकण्याचा व्यवसाय करत असे. तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने नेटवर्क वापरुन ग्राहक शोधले आणि मुलाची विक्री केली. बाळ तब्बल 350000 रुपयांना विकले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली आहे.
आरोपीची नावे
- छाया श्रीराम देशमुख (वय 38 वर्षे, रा. शाहूनगर, माजलगाव)
- किशोर वासुदेव भोजने (वय 32 वर्षे, रा. बुलढाणा)
- ललिता मनोहर भिसे (वय 38 वर्षे, रा. हातकणंगले जि. कोल्हापूर)
- दीपक गव्हाळकर ऊर्फ गवळी (रा. बेळगाव, कर्नाटक)
- आप्पा राघोबा केरकार (वय 65 वर्षे)
- नामदेव फोडू सावंत (वय 60 वर्षे)
- स्वप्नजा महादेव जोशी (वय 38 वर्षे, सर्व रा. सत्तरी, उत्तर गोवा)
दरम्यान, या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे आरोपी ललिता व दीपक हे दोघे सध्या फरार आहेत. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या धक्कादायक प्रकारामुणळे परिसात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुढे आलेल्या आरोपींचाच समावेश आहे की, हे एखादे मोठे रॅकेट आहे याबातब पोलिस तपास करत आहेत. लहान मुलांची विक्री, चोरी यांसारख्या घटना अनेकदा पुढे येतात. त्यातील काही घटनांचा पोलिसांमुळे छडा लागतो. मात्र, काही प्रकरणे वर्षानुवर्षे लोटून गेली तरीही त्याचा कोणताही मागमूस लागत नाही. असे अनेक प्रकरणांमध्ये घडते आहे. दरम्यान, अलिकडील अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.