
सांताक्रूज(Santacruz)येथील वाकोला परिसरातून 100 किलो ड्रग्ज पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फेंटानिल असे ड्रग्जचे नाव असून ते वाकोला परिसरात एका कारमधून हस्तगत करण्यात आले आहे. तसेच 25-25 किलो ड्रग्ज चार बॅगांमध्ये भरण्यात आले होते. देशातील ही सर्वात मोठी ड्रग्जची कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखला करण्यात आला आहे. या घटनेबाबत अजून तपास सुरु चालू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.