One State One Uniform: 'एक राज्य एक गणवेश' योजनेची यंदापासून होणार अंमलबजावणी; मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
Deepak Kesarkar | (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्रामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सरकार एक राज्य एक गणवेश (One State One Uniform) योजनेची अंमलबजावणी करण्याच्या तयारीमध्ये आहे. राज्यात सरकारी शाळेमधील विद्यार्थी एकाच गणवेशामध्ये दिसणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवस हे विद्यार्थी सरकारी योजनेचा आणि उर्वरित 3 दिवस शाळेने निर्धारित केलेल्या गणवेशाचा वापर करणार आहेत.

राज्यामध्ये 'एक रंग गणवेश' हे धोरण जाहीर करण्यात आलं आहे. पण त्याच्या अंमलबजावणीला उशिर झाला आहे. काही शाळांनी आधीच गणवेशाची ऑर्डर दिली असल्याने गणवेशाच्या बाबतीत 3-3 दिवसांची विभागणी झाली आहे. यंदा शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होणार आहे. सरकार कडून आता मोफत पुस्तकं आणि मोफत गणवेश दिला जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr)

गणवेशासाठी कंत्राट निघणार असून त्यामध्ये कोणीही सहभाग घेऊ शकणार आहे. यावेळी केसरकर यांनी माहिती देताना मुलांना दर्जेदार कपडे, बूट मिळणार आहेत. त्यामुळे राज्यातील शासकीय शाळांकडे मुलांची ओढ वाढणार आहे. नक्की वाचा: New Education Policy Rollout in Maharashtra: नवीन शैक्षणिक धोरण येत्या जून पासून लागू होणार, इंजिनियरिंगचे धडे मराठी भाषेतून मिळणार; दीपक केसरकर यांची माहिती .

नव्या शैक्षणिक वर्षामध्ये सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये एकच गणवेश करण्याचा विचार विभागाने घेतला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात जिल्हास्तरावर गणवेशासाठी निधी मिळतो. विद्यार्थी संख्येनुसार, तो शाळांना दिला जातो. नंतर शाळा कापड खरेदी करून त्याचे माप घेऊन गणवेश शिवून घेण्याची ऑर्डर देऊन विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देओऔ शकणार आहे.