Crime: गोवंडीतील मंदिरात चोरी केल्याप्रकरणी एकास अटक, दोन मूर्ती जप्त
प्रतिकात्मक फोटो ( Photo Credit: Pixabay )

मुंबईतील गोवंडी (Govandi) येथील एका मंदिरात चोरी (Theft) केल्याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police) एका 32 वर्षीय व्यक्तीला अटक (Arrested) केली होती. पोलिसांनी सांगितले की, अख्तर हैदर अन्सारी असे या आरोपीचे नाव असून तो दोन मूर्ती घेऊन पळून गेला होता. अटक केल्यानंतर त्याच्या घरातून दोन्ही मूर्ती जप्त करण्यात आल्या होत्या. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदार, प्रसाद पाताडे, जे मंदिराचे काळजीवाहू आहेत, त्यांनी सकाळी 6.30 च्या सुमारास मंदिराचे दरवाजे उघडले आणि परिसराची स्वच्छता केल्यानंतर ते सकाळी 7.30 च्या सुमारास निघून गेले.

सकाळी 9.30 च्या सुमारास ते परत आले असता त्यांना अनुक्रमे 5 किलो व 7 किलो वजनाच्या हनुमान व दुर्गा यांच्या दोन मूर्ती गायब असल्याचे दिसले. पितळेची 1.5 किलोची पूजा थाळी देखील गायब होती. सावध होऊन स्थानिकांकडे चौकशी केल्यानंतर पाताडे यांनी पोलिसांशी संपर्क साधून शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी मंदिराजवळील कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, अधिकारी संशयिताला शोधू शकले नाहीत. अधिकारी पुढे म्हणाले, आम्ही मुख्य रस्त्याकडे जाणारे कॅमेरे तपासले आणि संशयिताची ओळख पटवली. नंतर, आम्ही आमच्या हिस्ट्री शीटर्सची डायरी स्कॅन केली आणि संशयिताचे फुटेज अन्सारीच्या फोटोंशी जुळणारे आढळले. हेही वाचा Crime: पुण्यात दहीहंडी उत्सवासाठी वर्गणी कमी दिल्याने स्नॅक्स सेंटरची तोडफोड, चौघांना अटक

त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला गोवंडी येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली, असे अधिकाऱ्याने सांगितले.