दहीहंडी (Dahi Handi) उत्सवासाठी वर्गणी (Contribution) देण्यावरून झालेल्या वादानंतर रहाटणी (Rahatani) येथील स्नॅक्स सेंटरवर (Snacks Center) हल्ला करून लुटल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) गुरुवारी दहा जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केल्याचे सांगितले. रहाटणी लिंक रोड येथे राज स्नॅक्स अँड स्वीट सेंटर चालवणाऱ्या राहुल गुप्ता यांनी आज सकाळी वाकड पोलिस ठाण्यात (Wakad police station) तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दुकानातून सुमारे 10,000 रुपये घेतले. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी स्नॅक्स सेंटरमध्ये जाऊन बुधवारी रात्री 8 च्या सुमारास तक्रारदार राहुलचा भाऊ विवेक याच्याकडे वर्गणीची मागणी केली.
विवेकने 100 रुपये दिले, परंतु आरोपीने ते घेण्यास नकार दिला आणि त्यातील एकाने, ज्याचे नाव सुनील शेट्टी असे आहे, त्याला चापट मारली आणि 500 रुपयांची मागणी केली, असे तक्रारीत म्हटले आहे. विवेकने 200 रुपये देण्याचे मान्य केले तरी, आरोपीने रागाच्या भरात त्याला आणि राहुलला तसेच त्यांच्या वडिलांना मारहाण केली आणि स्नॅक्स सेंटरची तोडफोड केली. हेही वाचा 26 वर्षीय तरूण मद्यधुंद अवस्थेत गर्लफ्रेंड वर चाकूचे केले 50 वार; कार्पेट मध्ये मृतदेह गुंडाळून फेकण्याच्या प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला आणि शेट्टी आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आणि उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी आरोपींवर इतर गुन्ह्यांसह गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अभय दाभाडे तपास करत आहेत.