Lalbaugcha Raja 2022 (PC- Twitter)

Lalbaugcha Raja 2022 Visarjan Route: अनंत चथुर्तीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी लालबागच्या राजाचं (Lalbaugcha Raja 2022) विसर्जन गिरगाव चौपाटीवर होणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. दरवर्षी ज्या मार्गावरुन लालबागचा राजा विसर्जना करता निघतो तोच मार्ग यावर्षी सुद्धा असणार आहे. गेल्या दोन वर्षी कोरोनामुळे लालबागच्या राजाची मिरवणूक काढण्यात आली नव्हती. मात्र, यंदा लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. गणेशभक्तांनी राजाच्या विसर्जनादरम्यान सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बँड, लेझिम व ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट येथून निघते. मिरवणूक लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग (कुंभारवाडा), सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी. टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा मार्गाने गिरगाव चौपाटी येथे पोहोचते. (हेही वाचा - Lalbaugcha Raja 2022 Visarjan Date: लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीची तयारीसाठी आज चरणस्पर्शाची आणि मुखदर्शनाची रांग 'या' वेळेला करणार बंद)

Lalbaugcha Raja 2022 Visarjan Route

'या' मार्गाने होणार लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक -

लालबागचा राजा मंडळ ते चिंचपोकळी स्टेशन (पश्चिम) : लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक लालबाग फ्लायओव्हरच्या खालून चिचपोकळी स्टेशन ब्रिज (पश्चिम) वर जाते.

चिचपोकळी स्थानक ते भायखळा स्थानक (पश्चिम): चिंचपोकळी रेल्वे स्थानकापासून लालबागचा राजाची मिरवणूक डेलिस्ले रोडने भायखळा रेल्वे स्थानकाकडे (पश्चिम) जाते.

भायखळा स्टेशन ते नागपाडा जंक्शन: भायखळा येथून मिरवणूक “खडा पारसी” जंक्शनकडे जाते आणि तेथून क्लेअर रोड मार्गे नागपाडा जंक्शन (एस मोहनी चौक) पर्यंत जाते.

नागपाडा जंक्शन ते गोल देवल: नागपाडा येथून, लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक गोल देवलकडे जाते.

गोल देवल ते ऑपेरा हाऊस ब्रिज: गोल देवल ते लालबागच्या राजाची मिरवणूक सरदार वल्लभभाई पटेल रोड (एसव्ही रोड) कडेने सीपी टँक, प्रार्थना समाज आणि ऑपेरा हाऊस ब्रिज (वरेरकर पूल) पर्यंत जाते. त्यानंतर मिरवणूक गिरवार चौपाटीवर येते. येथे लालबागच्या राजाची आरती करून गणरायाला निरोप दिला जातो.