CM Devendra Fadnavis (Photo Credits: Instagram/SkKumar)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)  यांचा यंदाचा वाढदिवस कोणत्याही मोठया सोहळ्याशिवाय, बॅनरबाजीशिवाय सुद्धा खूप खास ठरला. काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाढदिवशी हारतुरे, केक, बॅनर व तत्सम गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा हीच रक्कम मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीमध्ये (CM Relief Fund)  दान करण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार, अनेकांनी या सूचनेला मान देऊन आपापल्या परीने निधीसाठी देणगी दिली, आणि विशेष म्हणजे या देणगीमुळे काल सहाय्य्यता निधीत विक्रमी वाढ झाली आहे, अवघ्या 24 तासात तब्बल 1  कोटी 75 लाख इतकी मोठी रक्कम निधी मध्ये जमा झाली. याबाबत माहिती देत आज फडणवीस यांनी एक खास ट्विट करून सर्वांचे आभार मानले आहेत.औरंगाबाद: मुख्यमंत्री सहाय्यता निधीत महिलेची 101 रुपयांच्या मजुरीची भेट; देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी केली उपकाराची परतफेड

देवेंद्र फडणवीस ट्विट

(हे ही वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नवनीत राणा यांनी दिले खास गिफ्ट, खासदारकीचा पहिला पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार)

दरम्यान, मुख्यमंत्री महोदयांसाठी वाढदिवसाचे भेट म्हणून कार्यकर्ते , नेते मंडळी यांपासून ते सामान्य नागरिकांनी सुद्धा पुढाकार घेऊन सहाय्यता निधीत योगदान दिले आहे. यामध्ये नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांचा सुद्धा समावेश आहे, त्यांनी काल आपला खासदारकीचा पहिला पगार या निधीत समर्पित करणार असल्याची घोषणा केली होती.तर दुसरीकडे औरंगाबादच्या एका मजुरी करणाऱ्या महिलेने फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपला एक दिवसाचा पगार सहाय्य्यता निधीत दिल्याचे देखील समजत आहे.