मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नवनीत राणा यांनी दिले खास गिफ्ट, खासदारकीचा पहिला पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार नवनीत कौर राणा (फोटो सौजन्य-File Image)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. यासाठी त्यांना राजकरणातील दिग्गद नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच फडणवीस यांना भेटण्यासाठी सर्व मंडळींना वर्षा बंगल्यावर उपस्थिती लावली. तर अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत कौर राणा (Navneet Kaur Rana) यांनीसुद्धा आज मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र त्याचसोबत खास गिफ्ट म्हणून खासदारकीचा पहिला पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार असल्याचे म्हटले आहे. राणा यांचा पगार दुष्काग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे.

नवनीत राणा यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर त्यांचे पती रवी राणा सुद्धा दिसून आले. तर फडणवीस यांनी आपला वाढदिवस जल्लोषात साजरा करु नये असे आवाहन केले होते. तर आज वाढदिवसानिमित्त राजकीय मंडळींनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीसुद्धा त्यांना ट्वीट करत अनोख्या पद्धतीने वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी खास फॅमिली फोटो शेअर केले आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि त्यांची मुलीचा फोटो शेअर केला आहे. अमृता फडणवीस या बॅंकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.(देवेंद्र फडणवीस यांच्या 49व्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदी यांनी दिल्या खास 'ट्वीट' च्या माध्यमातून शुभेच्छा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभळण्याच्या शैलीचं, कार्य पद्धतीचं कौतुक केलं आहे. त्याचसोबत मागील पाच वर्षात महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी फडणवीस यांचे उत्साहपूर्ण काम हे एक महत्वाचे कारण आहे, फडणवीस यांनी गरिबांना मदत करून वर आणले आणि त्यामुळे हा विकास शक्य झाल्याचे" मोदी म्हणाले आहेत.