Omicron Covid Variant: विदेशातून परतलेले 12 जण कल्याण-डोंबिवली, ठाणे जिल्ह्यातून बेपत्ता
Covid-19 Relief | (Photo Credit: Archived, edited, representative images)

विदेशातून भारतात परतलेले 12 जण कल्याण (Kalyan), डोंबिवली (Dombivl) आणि ठाणे (Thane ) जिल्ह्यातून बेपत्ता झाले आहेत. ओमिक्रॉन व्हेरीएंटची (Omicron Covid Variant) जगभरात भीती वाढत असताना विदेशातून परतलेले हे 12 लोक बेपत्ता झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार या 12 जणांचा प्रशासनाने शोध घेतला असता या सर्वांची घरे कुलूप लावून बंद केलेली आढळली. कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) प्रशासनाला विदेशातून पालिका हद्दीत आलेल्या 318 प्रवाशांची यादी प्राप्त झाली आहे. यातील काही लोक ओमिक्रॉन संसर्गाची जोखीम अधिक असलेल्या देशांतूनही आले असल्याचा संशय आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हेरीएंट ओमिक्रॉनचे 10 रुग्ण आढळले आहेत. राज्यात पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्येच आढळून आला होता. महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक वयाच्या 44% लोकांना कोरोना व्हायरस लसीचा दुसरी मात्रा मिळाली नाही. 45 पेक्षा अधिक वयाच्या 15% लोकांना कोरोना लसीची पहिली मात्राही मिळाली नाही. आता ओमिक्रॉनच्या भीतिने काही ज्येष्ठ नागरिक लसीची मात्रा घेऊ लागले आहेत. एप्रिल महिन्यात 45 पेक्षा अधिक वयाच्या लोकांचे लसीकरण सुरु झाले होते. तरीही महाराष्ट्रात अद्यापही 45 पेक्षा अधिक वय असलेल्या 15% लोकांचे लसीकरणाची एकही मात्रा मिळाली नाही. 44% लोकांना दुसरी मात्रा मिळाली नाही. (हेही वाचा, Omicron in Maharashtra: चिंता वाढली! महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव; कल्याण-डोंबिवली येथील व्यक्तीला लागण )

ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लसीकरण केंद्रावर अनेक ज्येष्ठ नागरिक कोरोना लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा घेण्यासाठी हजेरी लावू लागले आहेत. पाठिमागील 6 दिवसांमध्ये वय वर्षे 45 च्या वर 5,55,424 लोकांनी कोरोना लसीची पहिली मात्रा घेतली आहे. तर 8,70,116 नागरिकांनी कोरोना लसीची दुसरी मात्रा घेतली आहे.

ट्विट

महाराष्ट्रात कोरोना लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांची संख्या 9.14 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी 3.51 कोटी लोक 45 वर्षांवरील आहेत. 45 वर्षांवरील सुमारे 52,72,880 नागरिकांचे अद्यापही लसीकरण झाले नाही. ही संख्या 15% इतकी आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महाराष्ट्रातील नागरिकांनी 1.55 कोटी लोकांनी कोरोना लसीची पहिली मात्राही घेतली नाही.