ओझर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेस ऑनलाईन हॅकींगद्वारे 1 कोटी 55 लाख 95 हजार रुपयांचा गंडा
online hacking | (Photo credit: archived, edited, symbolic images)

ओझर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला (Ojhar Merchant Co-Operative Bank Ltd) तब्बल 1 कोटी 55 लाख 96 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. ऑनलाईन हँकिंगद्वारे (Online Hacking ) बँकेला हा गंडा घालण्यात आला आहे. बँकेने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार ओझर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे आयडीबीआय (IDBOI) बँकेत खाते होते. या खात्यातून ऑनलाई मनी ट्रान्फर या प्रकारे एकूण चार खात्यांमध्ये ही रक्कम वळती करण्यात आली. बँक प्रशासनाने तज्ज्ञांच्या आधारे केलेल्या अधिकच्या तपासणीत ही खातीही फेक असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम कशी काय वळती करण्यात आली याबाबत चौकशी केली असता, हँकींगद्वारे ही रक्कम वळती केल्याचे पुढे आले. (हेही वाचा, बँक घोटाळा केल्याप्रकरणी 6 हजार अधिकारी दोषी)

दरम्यान, हा प्रकार नेमका कधी घडला. केव्हापासून ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने वळती करण्यात येत होती. याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. ओझर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक प्रशासनाने घडल्या प्रकाराची माहिती दिल्याचे वृत्त आहे.