बँक घोटाळा केल्याप्रकरणी 6 हजार अधिकारी दोषी
बँक (Photo Credits: Twitter)

सध्या बँकेमध्ये होणारे घोटाळे दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत. त्यात आता चक्क बँकामधील 6 हजार अधिकाऱ्यांनी घोटाळा केल्याची धक्कादाय बाब उघडकीस आला आहे. या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली आहे.

राज्यातील स्टेट बँक, पीएनबी, कॅनेरा बँकसह अन्य 19 सरकारी बँका घोटाळ्याप्रकरणी अडकल्या आहेत. बुडीत कर्जामुळे बँकांना तोटा सहन करत आहेत. यावर लोकलभेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लेखी उत्तर सादर केले आहे. तसेच कर्ज देते वेळेस बँक नियांमांचे उल्लघंन आणि त्यातील त्रुटी वगळल्या  गेल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा-Bank strike in 2019: नववर्षात बँक कर्मचारी पुन्हा संपावर; 8,9 जानेवारीला बँक व्यवहार ठप्प!)

या प्रकरणी बँक अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविण्यात आले आहे. तर दोषी अधिकाऱ्यांवर दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. तसेच प्रमोशन बंदी, बडतर्फी अशा पद्धतीची कारवाई करण्यात येणार असल्याचे अरुण जेटली यांनी सांगितले आहे.