ड्रायव्हिंगसाठी जगातील 100 शहरांमध्ये 'मुंबई' सर्वात वाईट, तर कोलकाता शेवटून तिसरे- Report
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Wikimedia Commons, Lakun.patra)

मुंबई (Mumbai) देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. हे शहर जसे बॉलीवूड, मराठी संस्कृती, वडापाव, समुद्र यांसाठी प्रसिद्ध आहे तसेच ते लोकप्रिय आहे इथल्या ट्राफिक (Traffic) साठी.  गाडी घेऊन एकदा का तुम्ही बाहेर पडलात, तर इच्छित स्थळी कधी पोहचाल याचा काही नेम नाही. म्हणूनच मुंबई हे ड्रायव्हिंगसाठी (Driving) जगातील सर्वात वाईट शहर ठरले आहे. इतकेच नव्हे तर त्याखालोखाल नंबर लागतो तो कोलकाता या शहराचा. युरोपियन कार पार्ट्स किरकोळ रिटेलर मिस्टर ऑटो 2019 च्या ड्रायव्हिंग सिटीज इंडेक्सनुसार (2019 Driving Cities Index by European car parts retailer Mister Auto) एक यादी जाहीर जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जगात ड्रायव्हिंगसाठी मुंबई हे अतिशय वाईट असल्याचे नमूद केले आहे.

हा अहवाल तयार करताना जगातील 100 शहरांचा अभ्यास केला गेला. वाहनचालकांच्या ड्रायव्हिंगच्या परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या तीन मुख्य श्रेणींमध्ये त्यांची तुलना केली गेली. पायाभूत सुविधा, सुरक्षा आणि खर्चया त्या तीन श्रेणी होय. पुढे त्यांचा 15 उप-घटकांमध्ये भ्यास केला गेला. या यादीमध्ये जास्त गर्दी व ड्रायव्हिंगच्या कमी वेगाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला शेवटचे, म्हणजे 100 स्थान देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे भारतातील अजून एक शहर कोलकाता, 98 व्या स्थानावर आहे.

ड्रायव्हिंगच्या इतर सर्वात वाईट शहरांमध्ये उलानबातार, मंगोलिया (99), लागोस, नायजेरिया (97) आणि पाकिस्तानमधील कराची (96) यांचा समावेश आहे. दुसरीकडे, कॅनडामधील कॅलगरी हे जगात वाहन चालविण्याकरिता सर्वोत्कृष्ट शहर म्हणून गौरविण्यात आले आहे, त्यानंतर दुबई व कॅनडाचे आणखी एक शहर म्हणजे ओटावा यांचा नंबर लागतो. चौथ्या स्थानावर स्वित्झर्लंडमधील बर्न आणि अमेरिकेच्या टेक्सासमधील एल पासो याचा पाचवा क्रमांक आहे. या अहवालानुसार, नॉर्वेच्या ओस्लोमध्ये सर्वात महाग पेट्रोल 1.70 युरो प्रतिलिटर (135 रुपये) आहे, तर नायजेरिया मधील लागोस  येथे प्रतिलिटर c 36 सी असे सर्वात स्वस्त पेट्रोल मिळते.