Rohini Khadse, Raksha Khadse | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण (OBC Reservation) हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याचा सर्वात चर्चीत विषय. या विषयावरुन समाजात अतीशय तीव्र भावना आहेत. राजकीय पक्षांमध्येही आरोप-प्रत्यारोप झडत आहेत. दरम्यान, एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या पक्षात असलेले लोकही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन परस्परांना उत्तरे देताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते एकाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केलेल्या टीकेला खडसे यांच्याच स्नुषा खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या प्रश्नोत्तराची राज्याच्या राजकारणात सध्या भलतीच चर्चा आहे.

रोहिणी खडसे यांनी काय म्हटले?

भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही.

रोहिणी खडसे ट्विट

दरम्यान, रोहिणी खडसे यांनी केलेल्या टीकेला रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. टीव्ही नाईनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, 'ओबीसी समाजाने विचार केला नसता तर विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसेंना संधी मिळाली नसती', असे प्रत्युत्तर रक्षा खडसे यांनी रोहिणी खडसे यांना लगावला आहे. (हेही वाचा, Jayant Patil on BJP: अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव म्हणजे भाजपची वैचारिक दिवाळखोरी- जयंत पाटील)

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षण हे दोन्ही मुद्दे जोरदार गाजत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मराठा समाजाचे आरक्षण अनिश्चित काळासाठी लांबले आहे. तर ओबीसी आरक्षणाचीही गोची झाली आहे. दरम्यान, ओबीस आरक्षण हे महाविकासआघाडी सरकारमुळेच गेल्याचा विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षाचा आरोप आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तर, सर्वसामान्य जनता हा आरोप प्रत्यारोपांचा सामना हतबलतेने पाहात आहे. अनेकांच्या नोकऱ्या लटकल्या आहेत. अनेकांना शैक्षणीक प्रवेश घेताना अडचणी आहेत. दोन्ही समाजातील लोक निदर्शने करत आहेत. मोर्चे काढत आहेत. नेमका मार्ग कसा काढायचा याचा तोडगा अद्यापही कोणाला गवसला नाही. विचार विनिमय सुरु आहेत. आरक्षणावर केव्हा मार्ग निगणार हे अद्याप पर्यंत तरी स्पष्ट होऊ शकले नाही.