Ajit Pawar | (Photo Credit - X)

Maharashtra Budget 2024: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी राज्याच्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2024) 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना 1,500 रुपये मासिक भत्ता देण्याची घोषणा केली. अर्थखात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या पवार यांनी विधानसभेतील अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही योजना ऑक्टोबरमध्ये राज्याच्या निवडणुकीच्या चार महिने आधी जुलैपासून लागू केली जाईल. या योजनेसाठी वार्षिक अर्थसंकल्पात 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि उद्योगांवर भर देण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, आणखी एका कल्याणकारी योजनेची घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पाच जणांच्या पात्र कुटुंबाला 'मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने' (Mukhyamantri Annapurna Yojana) अंतर्गत दरवर्षी तीन मोफत एलपीजी सिलिंडर मिळतील. यावेळी अजित पवार यांनी सांगितलं की, आम्ही महाराष्ट्रातील कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान देण्यात येईल. दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात येईल. 1 जुलै 2024 नंतर सरकारने प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास आर्थिक मदतीत वाढ केल्याने आता कुटुंबातील सदस्यांना पूर्वीच्या 20 लाख रुपयांऐवजी 25 लाख रुपये मिळणार आहेत. (हेही वाचा - Maharashtra Budget for Farmers: कृषीपंप थकीत वीजबिल माफ, सौरउर्जा पंपास प्राधान्य; अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पात विशेष घोषणा)

सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला,युवा अश्या घटनांचा आकांक्षांना बळ देणारा अर्थसंकल्प मांडत असताना राज्याच्या प्रगती आणि विकासाला चालना देणाऱ्या अनेक अनेक योजना त्यांनी अर्थसंकल्पात जाहिर केल्या आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगीन प्रगतीसाठी अनेक योजना आणि घोषण त्यांनी या अर्थसंकल्पातून केल्या आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ 52 लाख 16 हजार 452 कुटुंबांना मिळणार आहे. अभियांत्रिकी, वास्तशास्त्र, वैद्यक निर्माणशास्त्र, औषध निर्माण शास्त्र, कृषिविषयक सर्व पदवी, पदविका अभ्यासक्रमासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिक दुर्बल घटकातील मुलींचे शंभर टक्के शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क सरकार भरणार आहे. 2 लाख 5 हजार मुलींना या योजनेचा लाभ होईल. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे. (हेही वाचा, Maharashtra Budget 2024: अजित पवार आज सादर करणार अंतरिम बजेट; शेतकरी, महिला, तरूणांसाठी कोणत्या घोषणा होणार?)

तथापी, नमो शेतकरी महा सन्मान योजनेतंर्गत 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबांना 5 हजार 318 कोटी 47 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर शेतमाल साठवण्यासाठी गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येणार. या योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात 100 गोदाम बांधले जाणार. आधारभूत किंमतीनुसार नाफेडकडून खरेदीसाठी शंभर कोटींचा फिरता निधी उपलब्ध करून दिला जाईल.  राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर प्रमुख शहरांच्या वाढत्या प्रवासी संख्येची गरज लक्षात घेऊन या वर्षात ३७ किलोमिटर लांबीच्या मेट्रो मार्गिक वाहतुकीसाठी खुल्या करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.