महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामध्ये शिवसेना नंतर एनसीपी पक्षतही फूट पडली. हा घाव केवळ पक्षापुरता मर्यादीत राहिला नाही तर पवार कुटुंबामध्येही यामुळे फूट पडलेली दिसली आहे. मुख्यमंत्री होण्याची संधी शरद पवारांच्या नेतृत्त्वामध्ये मिळत नसल्याचं सांगत आता मोठ्या यशाचं व्हिजन ठेवत अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट पक्षावर आपला दावा ठोकला आहे. पवार कुटुंब, एनसीपी सह महाराष्ट्राला देखील ही राजकीय खेळी चकीत करणारी आहे. पहिल्याच मेळाव्यात अजित पवारांनी थेट शरद पवारांवर निशाणा धरल्याने सध्या बारामती मध्ये नाराजी आहे. पण याचा आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीत काय परिणाम दिसू शकतात याची देखील चर्चा सुरू झाली आहे.
बारामती मध्ये अजित पवारांविरोधात रोहित पवारांना विधानसभेचं तिकीट मिळाल्यास ते लढणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवारांनी अनेक गोष्टी स्पष्टच बोलून दाखवल्या आहेत. बारामती विधानसभा केवळ अजित पवारच जिंकू शकतात असं म्हणताना त्यांनी आपण स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातीलही इतर कोणी व्यक्ती लढणार नसल्याचं म्हणाले आहेत. बारामतीच्या जनतेने अजित पवारांचं काम आणि शरद पवार यांचं व्हिजन यावर मतदान केलं आहे त्यामुळे अजित पवारांना त्यावरच मतदान होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे. 2019 च्या निवडणूकीतही अजित पवारांविरूद्ध भाजपाच्या गोपिचंद पडळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी पडळकर यांचं डिपॉजिट जप्त झालं आहे. पण आता थेट अजित पवारच भाजपा सोबतच्या सत्तेत सहभागी झाले असल्याने त्यांच्याविरूद्ध आव्हान कुणाचं असेल? हा प्रश्न आहे.
बारामती लोकसभा मतदार संघामध्येही पार्थ पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई दिसू शकते का? असा प्रश्न विचारला असता बारामती मध्ये नाराजी असली तरीही तेथील जनता सुज्ञ असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. Supriya Sule at Nashik: 'जो डर गया, वो मर गया', सुप्रिया सुळे यांचा नाशिक येथे घणाघात .
दरम्यान भाजपा कडून बारामती लोकसभा मतदार संघात चाचपणी करण्यासाठी त्यांचे अनेक बडे नेते येऊन गेले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीत बारामती मध्ये कशी गणितं बदलणार हे पाहणं आता अधिक उत्सुकतेचं बनलं आहे.