Supriya Sule (PC - Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आजपासून महाराष्ट्राचा झंजावती दौरा सुरु केला आहे. आज त्यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला (Sharad Pawar Nashik Yeola Sabha) येथे सभा घेतली. शरद पवार यांच्या भाषणापूर्वी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे भाषण झाले. या भाषणात सुळे यांनी बंडखोरांवर कोणाचाही नामोल्लेख न करता जोरदार घणाघात केला. 'जो डर गया, वो मर गया' म्हणत सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात शोले चित्रपटातील डायलॉग मारला. तसेच, जर आपण घाबरत असतो तर बंडखोरांसोबत सत्ताशरण गेले असते. पण, आमचे ते संस्कार नाहीत. आम्ही संघर्ष करत राऊ महाराष्ट्र काय आहे ते ईडीला दाखवून देऊ असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असे कसे घडले, असे अनेक लोक मला विचारतात. मी त्यांना सांगिते की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आईस घडले. ICE म्हणजे बर्फ. पण, इथे आयीसचा अर्थ वेगवळा आहे. ICE म्हणजे इनकम टॅक्स, सीबीआय आणि ईडी असा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक लोक आयीस झाल्याने गेले. गेले ते जाऊ द्या. जे आहेत त्यांच्यासोबत खंबीरपणे शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहू आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवून देऊ, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. (हेही वाचा, Sharad Pawar Conference: पराभूत झालेल्या प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद, सुप्रिया सुळे यांच्यावर अन्याय; शरद पवार यांची खंत)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला. आज शरद पवार यांचा फोडला. जे जे दिल्लीसमोर आव्हान म्हणून उभा राहात आहेत. त्यांना राजकारणातून संपवून टाकायचा दिल्लीतील अदृश्य हातांनी विडा उचलला आहे. त्यांचे स्वप्न आपण कधीही पूर्ण होऊ द्यायचे नाही. दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा आवाज उठवणारा माणूस म्हणजे शरद पवार. ते आवाज उठवतात म्हणूनच त्यांचा पक्षसंपविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. पण, त्यांचा हा प्रयत्न तडीस जाणार नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.