मुंबईतील नॉन-कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक धोका- सर्वेक्षणातून खुलासा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले असल्याने रुग्णांचा आकडा 3 लाखांच्या पार गेला आहे. याच दरम्यान राज्यातील मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून येथे सुद्धा लाखांच्या घरात रुग्णांची संख्या आहे. याच दरम्यान आता एक चिंताजनक बाबत एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. ती म्हणजे कोविड रुग्णांऐवजी नॉन-कोविड रुग्णालयामधील हेल्थकेअर्स कर्मचाऱ्यांना सर्वाधिक धोका असल्याचे सेरोच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. हा सर्वे राज्य सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या मुंबईतील 3 रुग्णालयांमध्ये करण्यात आला आहे.

सर्वेक्षणातून असे समोर आले की, सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या जेजे रुग्णालयातील 13.5 टक्के कर्मचारी आणि नॉन-कोविड सेंटरमधील सेरो पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सरकार कडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच राज्य सराकरच्या काही रुग्णालयात कोविड रुग्णांसह नॉन-कोविड रुग्णांवर सुद्धा उपचार करण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबईतील नायर रुग्णालयाचा सुद्धा समावेश आहे. तर काही दिवसांपूर्वीच महापालिकेने शहरातील राज्य सरकारची 16 पैकी 9 रुग्णालयांचे आता नॉन-कोविड सेंटर्समध्ये रुपांतर करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. कारण मान्सून मध्ये उद्भवणाऱ्या आजारांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे नागरि अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. (Coronavirus Update: महाराष्ट्रात तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना बाधित रुग्ण आहेत याची आजची सविस्तर आकडेवारी पहा)

दरम्यान, कोरोनामुळे 60 च्या वरील वयोगटातील नागरिकांना सर्वाधिक धोका आहे असे सांगितले जाते. मात्र वास्तविक रुग्णांची आकडेवारी पाहिल्यास 31 ते 40 वर्ष , 41 ते 50 वर्ष आणि 21 ते 30 वर्ष या गटात अधिक कोरोना पसरल्याचे दिसून आले आहे. राज्यात काल 25 जुलै पर्यंत देशात एकूण 3 लाख 66 हजार 368 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 9 हजार 251 नवे कोरोनाबाधित रुग्ण हे कालच्या दिवसातील आहेत. यासोबतच कालच्या 257 जणांच्या मृत्यूसह आजवर देशात इतके मृत्यू झाले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 45 हजार 481 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 2 लाख 7 लाख 194 जणांनी कोरोनावर मात केली आहे.