Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, काल 25 जुलै पर्यंत देशात एकूण 3 लाख 66 हजार 368 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 9 हजार 251 नवे कोरोनाबाधित रुग्ण हे कालच्या दिवसातील आहेत. यासोबतच कालच्या 257 जणांच्या मृत्यूसह आजवर देशात इतके मृत्यू झाले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 45 हजार 481 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 2 लाख 7 लाख 194 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणजेच मुंबईत सुद्धा काल 1090 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 52 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मुंबई शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 07 हजार 981 इतकी झाली आहे. मुंबई सह पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यात तर भिवंडी, कल्याण- डोंबिवली या महापालिका क्षेत्रात सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती ऍक्टिव्ह, मृत आणि कोरोना मुक्त रुग्ण आहेत जाणून घ्या.

Coronavirus Update: महाराष्ट्रात 'या' वयोगटात सर्वाधिक कोरोना रुग्ण; महिलांपेक्षा पुरुष कोरोनाबाधितांची संख्या अधिक

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी

Coronavirus In Maharashtra (Photo Credits: Twitter)

कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी मिशेन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात देण्यात आलेल्या सवलतींसह 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. तसेच येत्या 1 ऑगस्टला लॉक डाऊनच्या आणखी काही निर्बंधांना शिथिलता देण्यात येणार की नाही? याबाबत राज्य शासन लवकरच माहिती देण्याची अपेक्षा आहे.