Non-Bailable Traffic Offences: आता ओव्हर स्पिडिंग, बेदारकपणे गाडी चालवणं होणार गंभीर गुन्हा
Maruti Car (PC - Pixabay)

महाराष्ट्र मोटार व्हेईकल डिपार्टमेंट कडून काही ट्राफिक विभागाशी निगडीत गुन्हे अधिक कडक करण्यात आले आहेत. यामध्ये बेदारकपणे ड्रायव्हिंग करणं आणि ओव्हर स्पिडिंग करणं हे अजामीनपात्र गुन्हे करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट कमिशनर विवेक भीमनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या गुन्हांमध्ये जीवाला धोका आहे किंवा गंभीर दुखापत होऊ शकते त्यांना Motor Vehicles Act अंतर्गत अजामीनपात्र करण्यात आले आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडेही पाठवण्यात आला आहे.

सध्या Motor Vehicles Act अंतर्गत सारे गुन्हे जामीनपात्र आहेत. पण आता बेदारकपने गाडी चालवणं ज्यामधून मृत्यू किंवा गंभीर जखमा होण्याचा धोका आहे त्यांना अजामीनपात्र केले जाणार आहे. आता परिवहन विभागाकडूनही काही नियम कडक देखील करण्यात आले आहेत. ज्यामध्ये रस्ते अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी लायसन्स सिस्टीम कडक करण्यात आली आहे. रिफ्लेक्टिंग डिव्हाईस वापरणं, वाहनांमध्ये स्पीड लिमिटिंग डिव्हाईस लावणं, ऑटोमेटिक व्हेईकल फिटनेस टेस्ट आणि इफेक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक तसेच फिजिकल इंफोर्समेंट यांचा समावेश आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि अन्य हायवे वर या उपाययोजनांमुळे मृत्यूंची संख्या घटली आहे. मागील 3 महिन्यात त्यामध्ये 36% घट आहे. ट्राफिक पोलिसांकडून अनेक सुविधा स्वीकरल्या आहेत. त्या आता बीएमसी आणि MMRDA कडे आवश्यक स्टेप्स घेण्यासाठी पाठवल्या आहेत.