प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

देश विदेशातील पर्यटकांसाठी सर्वात आवडते ठिकाण गोवा अशी ओळख झाली आहे. परंतु आता गोवा सरकारने काही नियमांमध्ये बदल करत आता सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यास बंदी घातली आहे. असे केल्यास तुमच्या शिखाला 10 हजार रुपयांचा दंड बसणार आहे.

गोवा सरकार पर्यटन विभागाने नवीन नियमांनुसार गोव्यामध्ये समुद्रकिनारी अन्न शिजवणे, दारु पिण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर गोव्यात येणारे काही पर्यटक हे दारु प्यायल्यानंतर दारुच्या बाटल्या अशाच रस्त्यावर फोडून फेकून देतात. त्यामुळे फुटलेल्या काचांमुळे पायाला इजा होण्याची शक्यता असते. त्याचसोबत समुद्रकिनारी अस्वच्छता दिवसेंदिवस वाढत चालल्याने गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी सांगितले आहे.

तसेच हॉटेल बुकींगच्या बाबतीत ही नियम बदलण्यात आले आहेत. काही हॉटेल चालक हे पर्यटन मंत्रालयात बुकींगबद्दल कोणती ही माहिती न देता बुकिंग करुन घेत होत्या. यामुळे कोणताही गैरप्रकार होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळेच गोवा पर्यटन विभागाने नियम अधिक कडक करत आता कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. तर गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.