रविवारच्या दिवशी मेगाब्लॉक नाही,असा आश्चर्याचा धक्का मिळणे तसे मुंबईकरांसाठी काहीसे दुर्मिळच. पण, हा धक्का मुंबईकरांना आज मिळाला आहे खरं. दिवाळीच्या सणाला काही तासांचाच आवधी राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांची प्रवासाची गरज ध्यानात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने आजचा (रविवार) मेगाब्लॉक रद्द केल आहे. पण, हार्बर प्रवाशांना मात्र हा आनंद मिळू शकला नाही. करण, हार्बर मर्गावर आज सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
कसा असेल हार्बर मर्गावरील मेगाब्लॉत
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर
- सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेपर्यंत स. ११.४० ते दु. ४.१० पर्यंत सेवा खंडित राहील.
- चुनाभट्टी-सीएसएमटी मार्गावर स. ११.१० ते सायं. ४.४० पर्यंत सेवा खंडित राहील.
- सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल मार्गावर स. ११.३४ ते दु. ४.२३ पर्यंत पर्यंत सेवा खंडित राहील.
- सीएसएमटी ते वांद्रे/अंधेरी/गोरेगावपर्यंत स. ९.५६ ते दु. ४.१६ पर्यंत सेवा रद्द
- पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटीपर्यंत स. ९.५३ ते दु. २.४४ पर्यंतच्या लोकल सेवा खंडित केल्या आहेत.
- गोरेगाव/अंधेरी/वांद्रेहून सुटणाऱ्या लोकल स. १०.४५ ते सायं. ४.५८ पर्यंतच्या लोकल सेवा खंडित केल्या आहेत.
- या कालावधीत पनवेल ते कुर्लासाठी काही विशेष लोकल चालवल्या जातील.
(हेही वाचा, रेल्वे प्रवासात 'अॅप'च्या माध्यमातूनही करता येणार 'FIR')
मेल, एक्स्प्रेसही अर्धा ते सव्वा तास उशीराने धावणार
- इगतपुरी येथे सिग्नल यंत्रणेत नव्याने बदल करण्यासाठी मध्य रेल्वेने दु. ३.४५ ते रा. १.४५ पर्यंत एक
- ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे मेल, एक्स्प्रेसही अर्धा ते सव्वा तास उशीराने धावणार.
- काही गाड्या रद्द
दरम्यान, मेगाब्लॉकमुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे..
- एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस
- मुंबई-भुसावळ पॅसेंजर
- भुसावळ-सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस
- इगतपुरी-मनमाड-इगतपुरी पॅसेंजर या गाडया रद्द