COVID19: धारावीत आज 38 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; आतापर्यंत 496 जणांना कोरोनाची लागण
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

धारावीत आज 38 जणांची कोरोना (Coronavirus) चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत धारावीत 496 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून धारावीत कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. परंतु, धारावीत आतापर्यंत कोरोनाचे 18 बळी गेले आहेत. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.

याशिवाय आज मुंबईतील माहिम येथे 15 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माहिममध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. (हेही वाचा - Lockdown च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर खोटी माहिती पसरविल्या प्रकरणी 341 गुन्ह्यांची नोंद; तर 177 जणांना अटक)

दरम्यान, मुंबईमध्ये आज 547 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील 8172 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 322 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच 137 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्रात आज 790 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 12,296 वर पोहोचली आहे.