Covid-19 Vaccination in Maharashtra: महाराष्ट्रात कोविड-19 लसीकरण स्थगितीवर आरोग्य विभागाने दिले 'हे' स्पष्टीकरण
Vaccination | Photo Credits: Pixabay.com

काल (16 जानेवारी) देशव्यापी कोविड-19 लसीकरणाचा (Covid-19 Vaccination) शुभारंभ झाला. मात्र महाराष्ट्रातील (Maharshtra) लसीकरण तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची बातमी संध्याकाळी समोर आली. त्यात CoWIN अॅपमध्यील तांत्रिक अडचणींमुळे 18 जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात लसीकरण थांबवण्यात आल्याचे म्हटल होते. त्यानंतर मात्र लसीकरणाबाबतच्या विविध चर्चांना उधाण आलं. अनेक प्रश्न उपस्थित केले जावू लागले. त्यावर आता आरोग्य विभागानेच स्पष्टीकरण दिलं आहे.

"रविवार 17 जानेवारी आणि सोमवार 18 जानेवारी या दोन्ही दिवसांत लसीकरणाचे कोणतेही सत्र आयोजित करण्यात आले नव्हते. त्यामुळे लसीकरण रद्द करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही," असं आरोग्य विभागाने म्हटलं आहे. तसंच सरकारच्या मार्गदर्शन सुचनांनुसार पुढील आठवड्यापासून लसीकरण मोहिम आयोजित करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

ANI Tweet:

आरोग्य विभागाच्या या माहितीनंतर लसीकरण रद्द झालेले नसून या दोन दिवसांत ते आयोजितच करण्यात आले नव्हते, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार एका आठवड्यात केवळ 4 दिवस लसीकरण मोहिम राबवली जाऊ शकते. त्यामुळे राज्यांमध्येही त्यानुसारच लसीकरण करण्यात येणार आहे. (Coronavirus Vaccine Price: महाराष्ट्रात कोरोना लशीची किंमत किती असेल? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले 'हे' उत्तर)

दरम्यान, लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 18 हजार 338 हून अधिक म्हणजे सुमारे 64 टक्के कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. या टप्प्यात आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर्स, 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षांखालील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.