सोलापूर: राष्ट्रगान सुरु असताना नितीन गडकरी यांना भोवळ
Nitin Gadkari(Photo Credit: Twitter)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांना राष्ट्रगान  (National Anthem) सुरु असताना भोवळ आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) येथे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रगान सुरु होते. राष्ट्रगान सुरु असताना गडकरी यांना भोवळ आली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित आणि संयोजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आज (बुधवार, 1 ऑगस्ट 2019) ही घटना घडली.

नितीन गडकरी यांना भोवळ आली तेव्हा, विद्यापीठाचे कुलगुरु आणि इतर मान्यवरही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. नितीन गडकरी यांना भोवळ येताच त्यांना आसनावर बसविण्यात आले. दरम्यान, गडकरी यांंच्या प्रकृतीबाबत पुढील अधिक माहिती मिळू शकली नाही

दरम्यान, नितीन गडकरी यांना भोवळ येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याही आधी नितीन गडकरी यांना अशा प्रकारे कार्यक्रम सुरु असताना भोवळ आली. एका कार्यक्रमात त्यांना अशीच भोवळ आली होती. तेव्हा, राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले होते.

नितीन गडकरी यांना भोवळ व्हिडिओ

राजकीय नेते मंडळींचे दैनंदिन जीवन प्रचंड व्यग्र असते. या जीवनातत्यांची नेहमी दगदग असते. त्यांच्या आहार, झोप, व्यायाम यांमध्ये सातत्य नसते. त्यामुळे अनेकदा राजकीय मंडळींना ताण-तणावाला सामोरे जावे लागते. त्याचाच परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.