Mohan Bhagwat, Nitin Gadkari, Kishore Tiwari (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात सत्ता कोणाची या प्रश्नावरून सुरु असणाऱ्या चढाओढीत आता तारणहार म्ह्णून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)  यांनी मध्यस्थी करावी अशी विनंती करणारे एक पत्र शिवसेनेचे (Shivsena) नेते किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांनी लिहिले आहे. विशेष म्हणजे हे पत्र थेट गडकरी यांना न लिहिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यामार्फत पुढे नेण्याचा तिवारी यांचा प्रयत्न आहे. या पत्राच्या संबंधी भागवत यांनी गडकरींना माहिती देत त्यांना या परिस्थितीत पुढाकार घेण्यास सांगावे कारण जर का गडकरी यांनी मध्यस्थी केली तर हा प्रश्न दोन तासात सुटेल असा विश्वास तिवारी यांनी व्यक्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा पक्ष यांच्यातीळ दुवा असू शकतात कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काम करण्याची पद्धत गडकरी यांच्या परिचयासाची शिवाय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेशी सुद्धा गडकरी यांचे विचार जुळू शकतात. मुद्द्यांच्या आधारे महायुती निर्माण झाली त्यांची जण असणारे आणि अनुभवी नेते म्ह्णून गडकरी यांनी समजूत घालावी असे तिवारी यांचे म्हणणे आहे. दरम्यान, तिवारी यांच्या पत्राचे राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाने कोणतेही उत्तर दिलेले नाही.

ANI ट्विट

दरम्यान, शिवसेना आणि भाजपातील संघर्ष काही केल्या मिटण्याचे नाव घेत नाहीये. यंदाच्या निवडणुकीत भाजपाला इतर पक्षांच्या पेक्षा जास्त जागा मिळूनही 145 चा मॅजिक फिगर गाठता न आल्याने हा सर्व गोंधळ झाला आहे तर मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत जर का भाजप तयार नसेल तर अन्य पक्षांसोबत मिळून सत्ता स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत.