भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी आज अहमदनगर मध्ये 3028 कोटी महामार्गाचे पूजन केले तर 1046 कोटीच्या विकासकामांचे लोकार्पण केले आहे. यावेळी त्यांनी 'सुरत-नाशिक-सोलापूर- अहमदनगर' ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वेची घोषणा केली आहे. या हायवे मुळेराज्यातील वाहतूककोंडीच्या समस्येमधून सुटका होणार असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे. सोबतच हा प्रोजेक्ट अहमदनगरच्या विकासकामांसाठी एक मोठा प्रोजेक्ट ठरणार असल्याचं देखील म्हटलं आहे. या वेळी कार्यक्रमाला आमदार रोहित पवार, मंत्री हसन मुश्रीफ आणि एनसीपी अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते.
सूरत-नाशिक-सोलापूर-अहमदनगर ग्रीनफिल्ड हा पूर्णपणे ग्रीन अलाईन्मेंट असलेला रस्ता आहे. हा रस्ता सूरत ते चेन्नई पर्यंत पुढे विस्तारला जाणार आहे. उत्तर भारतामधून येणारं ट्राफिक मुंबई मध्ये येऊन मग पुढे सरकते. सोलापूर, कोल्हापूर वरून दक्षिण भारतामध्ये जातं. पण या नव्या मार्गामुळे ही वेळेची बचत आणि वाहतूक कोंडी फूटणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पेक्षा रुंदीला हा नवा हायवे तीन पट मोठा आहे. दरम्यान यामुळे आता अहमदनगर जिल्हा देखील मुख्य प्रवाहात येण्याची आणि येथे इतर व्यवसायाची कवाडं उघडण्याची संधी निर्माण होणार असल्याचं गडकरींनी म्हटलं आहे. नक्की वाचा: केंद्र सरकार ऑक्टोबर 2021 पासून इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या साखरेला दुप्पट प्रोत्साहन अनुदान देणार.
नितीन गडकरी ट्वीट
अहमदनगर, महाराष्ट्र में 4075 करोड़ रुपये की 527 किलोमीटर लंबी 25 राजमार्ग परियोजनाओं का भूमिपूजन और लोकार्पण। #PragatiKaHighway pic.twitter.com/xndpkiNt35
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 2, 2021
नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमामध्ये शिर्डी विमानतळ परिसरात स्मार्ट सिटी विकसित करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचं देखील स्वागत केले आहे. सोबतच रस्त्यांप्रमाणेच आता वाहनांमध्ये बदल करण्याचंदेखील गडकरी यांनी सुचवलं आहे. यावेळी इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे यायला हवं. शेतकर्यांनीही त्यासाठी साथ द्यावी म्हणजे त्यांना आर्थिक पाठबळ मिळू शकतं असं म्हटलं आहे. लवकरच सार्या वाहन निर्मिती करणार्या कंपन्यांना फ्लेक्स इंजिन गाड्या बनवण्याचा नियम बंधनकारक करणार असल्याचही त्यांनी स्पष्ट केले आहे.