2 दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सिंधुदुर्ग मध्ये येऊन नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन केल्यानंतर आता स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना धक्का देत 7 जणांनी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं जाहीर केले आहे. यावर नितेश राणेंनी (BJP MLA Nitesh Rane) खोचक प्रतिक्रिया देत वैभववाडी (Vaibhavwadi) मध्ये भाजपाचे 7 नगसेवक शिवसेनेमध्ये हे आमचं उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) व्हेलेंटाईन डे गिफ्ट असल्याची खोचक प्रतिक्रिया दिली आहे. राणे-ठाकरे हे हाडवैर सर्वशृत आहे. पण काही दिवसांपूर्वी मेडिकल कॉलेजच्या रूटीन क्लिअरन्स साईनसाठी नारायण राणेंनी फोन करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. याबद्दलही नितेश राणेंनी धन्यवाद म्हटलं आहे. शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांचे जिवंतपणीचं श्राद्धे घातले; संजय राऊत यांचा अमित शहा यांच्यावर पलटवार.
एका वाहिनीच्या मुलाखती दरम्यान दिलेला बाईट नितेश राणे यांनी ट्वीट करत - ''डियर उद्धवजी हॅप्पी व्हेलेंटाईन डे! लव्ह नितेश नारायण राणे' असं ट्वीट केले आहे. या प्रतिक्रियेमध्ये नितेश राणे म्हणाले शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे. त्यामुळे व्हेलेंटाईन डे च्या निमित्ताने हे 7 नगरसेवक आमचं व्हेलेंटाईन डे गिफ्ट समजून ठेवून घ्या अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपातून आलेल्या 7 जणांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होत आहे. नक्की वाचा: Vaibhavwadi Nagarpanchayat Election: वैभववाडी नगरपंचायतीत भाजपच्या एकहाती सत्तेला सुरुंग; सात नगरसेवकांचा राजीनामा.
नितेश राणे ट्वीट
Dear Uddhavji,
Happy Valentines Day !
Love : Nitesh Narayan Rane 😅 pic.twitter.com/BOEiAnmBMq
— nitesh rane (@NiteshNRane) February 9, 2021
दरम्यान भाजपाकडून या पक्ष प्रवेशावर प्रतिक्रिया देताना हे 7 नगरसेवक शिवसेनेत जाणं आम्हांला फरक पडणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. राणे कुटुंबाकडून मागील काही महिन्यात अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी देखील आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक अरोपांचे हल्ले करण्यात आले होते.