पुण्यातील वानवडी परिसरात पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. पूजाच्या आत्महत्येनंतर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. पूजाच्या आत्महत्येमागे मोठ्या मंत्र्याचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचं दिसून येत आहे. पूजाच्या आत्महत्येवरून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनीही पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना तसेच महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
जे दिशा बरोबर झाले. तेच पूजा बरोबर होणार असेल. तर तो “शक्ती” कायदा, काय चाटायचा आम्ही? असं नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. (वाचा - Pooja Chavan आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा- चित्रा वाघ)
जे दिशा बरोबर झाले..
तेच पुजा बरोबर होणार असेल..
तर तो "शक्ती" कायदा.. काय चाटायचा आम्ही?
— nitesh rane (@NiteshNRane) February 12, 2021
याशिवाय भाजप नेते निलेश राणे यांनीही महाविकास आघाडी सरकारवर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येमागे ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याची चर्चा आहे. तुरुंग पर्यटन या सरकारने सुरू केलं आहे कुठेतरी वाचण्यात आलं पण जर एकाच इमारतीमध्ये गुन्हेगार पर्यटन सुरू करायचं असेल तर मंत्रालय सध्या एक नंबर वर आहे.
पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येमागे ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याची चर्चा आहे. तुरुंग पर्यटन या सरकारने सुरू केलं आहे कुठेतरी वाचण्यात आलं पण जर एकाच इमारतीमध्ये गुन्हेगार पर्यटन सुरू करायचं असेल तर मंत्रालय सध्या एक नंबर वर आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 12, 2021
दरम्यान, भाजप नेता चित्रा वाघ यांनीदेखील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्टसह एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की, पुजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे updates पहाता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी स्यु-मोटोतंर्गत तक्रार दाखल करत मंत्री संजय राठोड वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्र्यांकडे एवढे पुरावे असतांनाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय, असा सवालही चित्रा वाघ यांनी केला आहे.