Mahim Beach (Photo Credits-ANI)

अम्फान (Amphan) चक्रीवादळानंतर आता निसर्ग (Nisarga) नावाच्या वादळाचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. हे निसर्ग वादळ महाराष्ट्रासह गोवा, सुरतच्या येथे सुद्धा धडकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नागरिकांसह आपत्ती दलाच्या तुकड्यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. याच दरम्यान आता माहिम येथील समुद्रात गेलेले मच्छिमार बोटीसह किनाऱ्यावर परतले आहेत. निर्सग चक्रीवादळाचा धोका पाहता मच्छिमारांना पुढील दोन-तीन दिवस समुद्रात जाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.(Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळ संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात एनडीआरएफ पथक तैनात- एस. एस. प्रधान)

भारतीय हवामान खात्याने असे म्हटले आहे की, निसर्ग चक्रीवादळ 3 जूनला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दमणच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर धडकू शकते. त्यामुळे महाराष्ट्रात एनडीआरएफच्या एकूण 10 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत निसर्ग चक्रीवादळाबाबतच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. केंद्राने राज्य सरकारला निसर्ग चक्रीवादळावर लक्ष ठेवावे असे सांगितले आहे.(Nisarga Cyclone Latest Update: अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होणार, 3 जूनच्या दुपारी निसर्ग चक्रीवादळ हरिहरेश्वर, दमण जवळून पुढे सरकणार)

निसर्ग चक्रीवादळ 1 ते 4 जून दरम्यान नॉर्थ महाराष्ट्र आणि गुजरात येथे घोंघावणार आहे. या दोन्ही राज्याच्या किनारपट्टीवरुन निसर्ग चक्रीवादळ जाणार आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे राज्य सरकार अलर्ट झाले असून यासंबंधित महाराष्ट्र आणि गुजरात येथे चक्रीवादळापूर्वी सुचना देण्यात आली होती. कारण येथे 3 जूनला राज्यातील काही भागात तुफान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.