महाराष्ट्रावर निसर्ग चक्रिवादळ (Nisarga Cyclone) संकटाचा संभाव्य धोका ओळखून राष्ट्रीय अपत्ती निवारण दल (National Disaster Response Force) आणि राज्य सरकार आतापासूनच कामाला लागले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे महासंचालक (डीजी) एस. एन. प्रधान (SN Pradhan) यांनी माहिती देताना सांगितले की, मराहाष्ट्रावरील निसर्ग चक्रीवादळाचा संभाव्य धोका ओळखून आवश्यक त्या प्रमाणात एनडीआरएफ (NDRF) तुकड्या तैनात आहेत. दरम्यान, अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी जवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. कमी दाबाचा हा पट्टा वाढत आहे. त्यामुळे आज (2 जून) महाराष्ट्र किनारपट्टी नजीक 'निसर्ग' चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ज्या पद्धतीने निसर्गाचे संकेत मिळत आहे त्यानुसार सध्यास्थितीत प्रतितास 110 ते 125 किलोमीटर वेगाने वारे चक्राकार वाहात आहे. त्याचे रुपांतर वादळात झाल्यास उद्या (3 जून) दुपारपर्यंत हे वादळ महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात येणाऱ्या हरिहरेश्वर आणि दमन कनिरापट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Nisarga Cyclone च्या संभाव्य धोक्यामुळे पालघर मध्ये 3 जूनला सर्व दुकाने व व्यापारी आस्थापने बंद ठेवण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश)
ट्विट
Deployment of NDRF team in Maharashtra in view of impending severe cyclone for necessary preventive actions by state: SN Pradhan, Director General (DG) of National Disaster Response Force (NDRF). pic.twitter.com/R4gPai3QY6
— ANI (@ANI) June 2, 2020
हवामान विभागाने दिलेली माहिती अशी की, लक्षद्वीप बेटांलगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हीच स्थिती पुढे उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीच्या दिशेने पुढे जात आहे. त्यामुळे सोमवारी (1 जून) दुपारी ही स्थिती गोव्यातील पणजीपासून 340 किलोमीटर, मुंबईपासून 630 किमी तर गुजरात राज्यातील सूरतपासून 850 किलोमीटर नौऋत्येला होती. हे कमी दाबाचे क्षेत्र सध्यास्थितीत प्रति तास 13 किमी वेगाने उत्तरेकडे निघाले आहे. त्यामळे आज अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होऊ शकते.