Nilesh Rane | (Photo Credits: Facebook)

पुणे महानगरपालिकेने मालमत्ता कर न भरल्याच्या कारणावरून भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane)  यांची मालमत्ता सील केल्याचं वृत्त आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, निलेश राणे यांनी पुणे महापालिकेत (Pune Mahanagar Palika)  सुमारे 3 कोटी 77 लाख 53 हजार रूपयांचा मालमत्ता कर थकित ठेवला आहे. त्या विरूद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात निलेश राणे यांची डेक्कन (Deccan)  भागामध्ये मालमत्ता आहे. या भागात व्यावसायिक जागेचा कर न भरल्याच्या कारणास्तव महापालिकेने कारवाई केली आहे.

पुण्यात डेक्कन कॉर्नर भागामध्ये नारायण राणेंच्या मालकीचा मॉल आहे. 3 मजली दुकानावर थकबाकी होती. मॉलची सुमारे 50 कोटी 60 लाखांची थकबाकी आहे. या बाबत पुणे मनपा कडून अनेकदा पाठपुरवठा करून नोटीस पाठवण्यात आल्या होत्या मात्र कर भरला न गेल्यान्र पालिकेने आता थेट कारवाई केली आहे. दरम्यान एबीपी माझाच्या वृत्तानुसार, निलेश राणे यांनी 'महापलिकेचे पैसे थकले म्हणून त्यांनी कारवाई केली. त्यात चूकीचे काही नाही. या जागेची थकबाकी भरली नसती तर वेगळी बाब आहे, आता कारवाई झाली आहे आणि आम्ही थकबाकी भरू' असे सांगितले आहे. Nilesh Rane vs Ravindra Chavan: निलेश राणे यांची राजकारणातून आकस्मिक निवृत्ती; भाजपकडून मनधरणी .

निलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. माजी खासदार आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राजकारणाला कंटाळून आपण राजकीय संन्यास घेत असल्याचं घोषित केले होते पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते पुन्हा राजकारणात सक्रिय होण्यास तयार झाले आहेत.