तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) झाालेल्या नुकसानाची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज कोकण दौऱ्यावर आहेत. यावरुन आता भाजप नेते निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कोकण दौरा केल्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोकण दौरा करणे भाग पडले, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री बाहेर पडले यावर माध्यमांना देखीव विश्वास नसल्याने त्यांनी उद्धव ठाकरे यांचा पाठलाग सुरु केल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
निलेश राणे यांनी ट्विटमध्ये लिहिले, "माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, सतत उद्धव ठाकरे कुठे पोहोचले याचा पाठलाग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं. फडणवीस साहेब कोकण दौऱ्यावर आले म्हणून झक मारत मुख्यमंत्र्यांना यावं लागलं, ही औपचारिकता आहे, दुसरं काही नाही."
निलेश राणे ट्विट:
माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, सतत उद्धव ठाकरे कुठे पोहोचले याचा पाठलाग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं. फडणवीस साहेब कोकण दौऱ्यावर आले म्हणून झक मारत मुख्यमंत्र्यांना यावं लागलं, ही औपचारिकता आहे, दुसरं काही नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 21, 2021
यापूर्वी नितेश राणे यांनी देखील मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा लिपस्टीक दौरा असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर कोकणाला आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दरम्यान, कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. फोटोसेशनसाठी नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणदौऱ्यात बोलले. तसंच पंचनामे करुन लवकरच मदत जाहीर केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी जनतेला दिले.