Tauktae Cyclone मुळे  झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी CM Uddhav Thackeray आज रत्नागिरी, सिंधुदुर्गात; पंचनामे झाल्यानंतर मदत जाहीर करण्याची केली घोषणा
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी जवळून मागील काही दिवसांत गेलेल्या तौक्ते चक्रीवादळचा (Tauktae Cyclone) फटका कोकणाला बसला आहे. या चक्रीवादळात कोकणवासियांचे मोठ्या प्रमाणात घरांचे आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या कोरोना आणि त्यापाठोपाठ चक्रीवादळाच्या दोन वर्षातील दुसर्‍या तडाख्यामुळे कोकणवासीय संकटामध्ये आहेत. आज रत्नागिरी (Ratnagiri)  आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांमधील काही गावांना मुख्यमंत्री भेट देणार आहेत. आज रत्नागिरी मध्ये उतरल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी आणि काही अधिकार्‍यांसोबत चर्चा केली आहे. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मी कोकणवासियांच्या मदतीला आलो आहे असे सांगत दिलासा देताना येत्या 2 दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण होतील. हे पंचनामे पाहून नेमक्या कोणत्या निकषांवर मदत जाहीर करायची हे ठरवले जाईल आणि नक्कीच सरकार मदतीचा हात पुढे करेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे. Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना तातडीने भरघोस आर्थिक मदत देण्यात यावी - देवेंद्र फडणवीस.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज पालकमंत्री उदय सामंत, अनिल परब, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुर्नविकास मंत्री विजय वडेट्टीवार हे देखील आढावा बैठकीला उपस्थित होते. रत्नागिरी मध्ये बैठक झाल्यानंतर ते पुढे सिंधुदुर्गात गेले आहेत. दरम्यान चक्रीवादळातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजचा दौरा 4 तासांचा असल्याने त्यावरून विरोधकांनी टीकास्त्र डागलं आहे पण आपण हवाई दौरा करत नसल्याचं सांगत या टीकेला उत्तर दिलं आहे.

CMO Maharashtra ट्वीट

 

दरम्यान यावेळेस सलग दुसर्‍यांदा कोकणाला चक्रीवादळाचा फटका बसला आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आता या संकटांचा सामना करण्यासाठी सुसज्ज यंत्रणा उभी करण्याची गरज बोलून दाखवली आहे. त्यामध्ये तात्पुरते पक्के शेल्टर, वीज पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी वीज खांब आणि पुरवठा मध्ये बदल आवश्यक असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे कोकणवासीयांना किती आणि कशी मदत मिळेल हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.