Devendra Fadnavis | (File Photo)

Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याचं (Raigad District) मोठं नुकसान झालं असून बाधितांना तातडीनं भरघोस आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारकडे केली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल चक्रीवादळ ग्रस्त रायगडला भेट दिली. तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन नुकसानीची आणि प्रशासन करत असलेल्या मदतीची माहिती घेतली. (वाचा - Cyclone Tauktae मध्ये अडकलेल्या Barge P305 मधून 184 लोकांची सुटका करुन INS Kochi मुंबईत दाखल (See Pics))

त्यानंतर माध्यमांशी बोलताना गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीची भरपाई अजून मिळाली नाही. यावेळी तरी लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. तौक्ते चक्रीवादळग्रस्त आठही राज्यांना केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यात महाराष्ट्राला सुद्धा मदत मिळणार, हे केंद्र सरकारने स्पष्ट केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.