देशभरात 1 सप्टेंबर पासून वाहतुकीसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाची रक्कम 10 पट अधिक वसूल केली जाणार असल्याचे नव्या नियमानुसार सांगण्यात आले होते. परंतु अद्याप राज्यात वाहतुकीच्या नव्या नियमाची अंमबजावणी करण्यात आली नाही. याबाबत लवकरच आता अधिसूचना जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परिवहन अधिकारी किंवा वाहतूक पोलिसांनी नव्या नियमानुसार जर चालकांकडून पैसे घेतल्यास ते नियमबाह्य ठरणार आहे. तसेच राज्यानुसार दंडाची रक्कम निश्चित करण्यात यावी अशी भुमा देण्यात आली आहे. परिवहन विभागाला वाहतुकीचे कोणते नियम मोडल्यास किती रुपयांचा दंड वसूल करावा याबाबतचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाला पाठवला आहे.तसेत दिवाकर रावते यांच्या अभिप्रायानंतर या नव्या नियमानुसार दंडाच्या वसूलीसाठी मंजूरी मिळणार आहे. याबाबत लोकमतेने अधिक वृत्त दिले आहे.(खबरदार! वाहतुकीचे नियम मोडाल तर, होईल 25,000 रुपये दंड, 3 वर्षे तुरुंगवास; जाणून घ्या New Traffic Rules in India 2019)
पुढील दोन दिवसात वाहतुकीच्या नव्या नियमानुसार दंडाची रक्कमेची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. त्या नंतरच नव्या नियमानुसार दंडाची वसूली करण्यात येणार आहे. तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांकडून ई-दंड प्रकारे पैसे वसूल केले जाणार आहेत. तर गेल्या काही वर्षात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले होते. हा आकडा प्रतिवर्ष तब्बल दीड लाखाच्या घरात असल्याचे अधिकृतपणे सांगितले जाते. केंद्रिय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही अनेकदा याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक विभागानेच जुन्या मोटारवाहन कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक 16 व्या लोकसभेत मांडले होते.