स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! आई आणि बाळाचं नातं अनोखं असतं. आई आपल्या बाळासाठी वाट्टेल ते करु शकते ह्याची अनुभूती अनेकदा आली असेल. पण आई कधी आपल्या स्वतच्या पोटच्या गोळ्याला नुकसान पोचवू शकते हे ऐकून देखील अंगावर काटा येतो. पण आईने स्वतच्या बाळाला उंच इमारतीच्या खिडकीतून खाली फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडला आहे. नवजात बालकास मातेने इमारतीच्या खिडकीतून फेकून दिलं. नवी मुंबईतील उलवे परिसरात इमारतीतील रहिवाशांना अचानक वरुन काहीतरी पडल्याचा आवाज आला. तोच इमारतीच्या खालच्या परिसरात येवून बघताचं एक छोटं अभ्रक वरुन खाली पडल्याचं आढळलं. तोचं इमारतीतील रहिवाशांनी संबंधीत घटनेबाबत नवी मुंबई पोलिसांना माहिती दिली. पोलिस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधीत प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली.
पोलिसांकडून इमारतीतील सगळ्या फ्लॉट्सची झडती घेण्यात आली. तोच इमारतीतील एका फ्लाटच्या शौचालयाला काचं नसल्याचं आढळून आलं. पोलिसांनी चौकशी केली असता तिथे राहणाऱ्या कुटुंबाची चौकशी केल्यावर या कुटुंबात तीन सदस्य असून त्यांच्या गावाकडील दोन महिला नातेवाईक येथे राहत असल्याची माहिती मिळाली. तर याचं घरातून अभ्रकाला फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. (हे ही वाचा:- Mumbai: मुंबईत महिला डॉक्टरवर हल्ला; आरोपीने दिली जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल)
या फ्लाटमधील १९ वर्षीय युवतीने एका नवजात बालकाला जन्म दिला. मात्र प्रसूतीनंतर ही युवती रात्रीच्या वेळी उलवे येथील घरी आली होती. तिने सामाजिक कलंकातून मुक्तता मिळवण्यासाठी ह्या नवजात बालकाला शौचालयाच्या खिडकीतून फेकून दिले. ह्या महिलेचे काही वर्षांपासून मामाच्या मुलावर प्रेम होते अशी माहिती हाती आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एनआरआय पोलीस ठाण्यात १९ वर्षिय युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.